शिक्षण मंत्री आणि केवळ 10 वी पास? असं म्हणत अनेकांनी त्यांना हिणवलं, मात्र त्यांनी जिद्द धरली आणि आपलं शिक्षण पूर्ण करण्याकडे वाटचाल सुरू ठेवली.झारखंडचे शिक्षण मंत्री जगरनाथ महतो यांचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. महतो केवळ 10 वी पास होते, इतकं शिक्षण असल्या कारणाने विरोध पक्षाकडून त्यांच्यावर आरोप केले जात होते.
2020 च्या सुरुवातील शिक्षण मंत्री जगरनाथ महतो यांनी कार्यभार हाती घेतला आणि टीकेविरोधात जाऊन मोठा निर्णय घेतला. यावेळी त्यांनी 12 वीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला महतो 11 वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बोकारे देवी महतो इंटर कॉलेजला पोहोचले. 2020 मध्ये त्यांनी 1100 चा फॉर्म भरून अॕडमिशन घेतलं. 2021 मध्ये 11 वीची परीक्षा देण्याच्या तयारीत होते. मात्र यादरम्याना कोरोनाच्या संसर्गामुळे ते गंभीर आजारी पडले आणि त्यांना परीक्षा देता आली नाही.