इयत्ता दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आलं होतं. आता बोर्डाने दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जारी केलं आहे. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा येत्या 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार असून ती 3 मार्च पर्यंत चालणार आहे. तर दहावीची परीक्षा ही 25 फेब्रुवारी ते 14 मार्चदरम्यान होणार आहे. लेखी तसेच प्रात्यक्षिक परिक्षेचं वेळापत्रक जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या दृष्टीकोनातून तयारी करण्यास पुरेसा कालावधी मिळणार आहे.
इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत. इयत्ता बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या कालावधित घेतली जाणार आहे. इयत्ता बारावीची लेखी परीक्षा ही 4 मार्च ते 30 मार्च दरम्यान होणार आहे. तसेच इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान होणार आहे.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. बोर्डाकडून याकरिता तयारीदेखील सुरु करण्यात आली आहे. ऑफलाईन पद्धतीने 36 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याचं नियोजन सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, येत्या 24 जानेवारीपासून राज्याती इयत्ता पहिली ते इयत्ता बारावी अशा सर्वच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी माहिती दिली आहे. कोरोन प्रतिबंधक नियमांचे पालन करुन शाळा सुरु करण्यात येणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.