पुढील 5 दिवस राज्यात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस; पुण्यासह या जिल्ह्यांना इशारा
किमान तापमानाचा पारा घसरल्यानंतर, राज्यात थंडीची चाहूल लागली आहे. राज्यात अनेक ठिकाणी दिवसा उन्हाचा तडाखा आणि पहाटे गारठा पडत आहे. असं असताना मान्सूनच्या परतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे. आज दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि वेगवान वाऱ्याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने आज पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुढील काही तासांत याठिकाणी जोरदार पाऊस धडकण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर आणि सांगली या पाच जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. पुढील काही तासांत संबंधित जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, 30 ते 40 किमी प्रतितास वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. आजपासून पुढील पाच दिवस राज्यात कमी-अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार असून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
दिव्या भारतीच्या वडिलांचं निधन; एके काळी हत्येचा आरोप असलेला साजिद नाडियाडवाला होता अखेरपर्यंत सोबत
दिवंगत अभिनेत्री दिव्या भारतीचे वडील ओम प्रकाश भारती यांचं निधन झालं आहे. 30 ऑक्टोबर रोजी ओम प्रकाश कालवश झाले; पण त्याबाबतची माहिती आज समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या भारतीच्या अकाली निधनानंतर, चित्रपट निर्माता आणि दिव्याचा पती साजिद नाडियादवालाच तिच्या आई-वडिलांना सांभाळत होता. तो दिव्याच्या आई-वडिलांनाही ‘मॉम आणि डॅड’ असंच संबोधत होता. ओम प्रकाश यांच्यावर अंत्यसंस्कार केले जात असतानाही साजिद उपस्थित होता. ‘टीव्ही नाइन हिंदी’ने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
दिव्या भारतीचं निधन होऊन आता 28 वर्षं झाली आहेत. वयाच्या 16 वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या दिव्याने अवघ्या तीन वर्षांमध्ये अमाप लोकप्रियता मिळवली होती.
टीम इंडियाच्या सलग दुसऱ्या पराभवानंतर शास्त्रींचा ‘angry look’ व्हायरल
टी20 वर्ल्डकप स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंड विरद्धच्या पराभवानंतर मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. युजर्सनी टीम इंडियासह शास्त्रींनादेखील ट्रोल केले आहे.
रविवारी न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील टीम इंडियाला 8 गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. यापूर्वी, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानकडून पहिल्यांदाच पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे टीम इंडियाच्या या निराशजनक कामगिरीवर चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. चाहत्यांसह मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीदेखील नाराज असल्याचे पाहायला मिळाले.
पाटणाच्या गांधी मैदान बाॕम्बस्फोट प्रकरणातील 4 दोषींना फाशीची शिक्षा
बिहारची राजधानी पाटणा येथील गांधी मैदानात 2013 साली झालेल्या बॉम्बस्फोटाप्रकरणी एनआयएच्या विशेष न्यायालयाने आज निकाल जाहीर केला आहे. न्यायालयाने बॉम्बस्फोटातील 4 दोषींना फाशीची शिक्षा सुनावली आहे, तर दोघांना जन्मठेपेची आणि दोन दोषींना 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे.
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची वार्ता, ग्रॕच्युईटीत वाढ
सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मंत्रालयाने निवृत्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना रोख रक्कम आणि ग्रॅच्युइटी जारी केली आहे.विभागाने एका ट्विटमध्ये ही माहिती दिली आहे ज्यात असे म्हटले आहे की, खर्च विभागाने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ग्रॅच्युइटी आणि लीव इनकैशमेंटबाबत 7 सप्टेंबर 2021 रोजी ऑफिस ऑफ मेमोरेंडम जारी केले आहे. हे असे कर्मचारी आहेत जे जानेवारी 2020 ते जून 2021 या कालावधीत सेवानिवृत्त झाले आहेत.
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीचा शुभमुहूर्त
दिवाळीचा सण आता अगदी तोंडावर आला आहे. खरंतर आजपासून म्हणजेच वसुबारसेच्या दिवसापासून दिवाळी सुरू होते, असं मानलं जातं. तरीही धनत्रयोदशीच्या दिवसापासून खऱ्या अर्थाने दिवाळी सुरू होते. आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीला धनत्रयोदशी असं म्हटलं जातं. समुद्र मंथनादरम्यान भगवान धन्वंतरी या दिवशी सोन्याचा घोडा घेऊन प्रकट झाले होते, असं मानलं जातं. भगवान धन्वंतरी हे देवांचे वैद्य. त्यामुळे धनत्रयोदशीदिनी भगवान धन्वंतरी यांचं पूजन केलं जातं. तसेच या दिवशी भगवान कुबेर आणि लक्ष्मीचं पूजनही केलं जातं. धनत्रयोदशीदिनी खरेदी करणं शुभ असतं, असं मानलं जातं. म्हणूनच धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दागिने, भांडी, घरात लागणाऱ्या किमती वस्तू, कार, मोटारसायकल, जमीन, नवं घर आदींची खरेदी केली जाते. धनत्रयोदशीला खरेदी केलेल्या वस्तूंमध्ये वर्षभरात 13 टक्के वाढ होते म्हणजेच घरात सुख-समृद्धी नांदते, पैशांची कमतरता भासत नाही, असं मानलं जातं.
अखेर अनिल देशमुख ED कार्यालयात हजर…
अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल झाले. ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ते आज आपला जबाब नोंदवणार असल्याचं समजतंय.
100 कोटी वसुलीप्रकरणी आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 4 ते 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती.
दिवाळी नंतर बाॕम्ब फोडणार ,देवेंद्र फडणवीस यांचा मलिक यांना इशारा
राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ड्रग्जचा उद्योग करणाऱ्यांचे सूत्रधार आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केला आहे.मलिक यांनी सोमवारी सकाळी भाजप आणि ड्रग्ज माफियांचे संबंध असल्याचा आरोप केला, तेसच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचा एक फोटो ट्विट केला. या फोटोमध्ये अमृता फडणवीस यांच्यासोबत दिसणारी व्यक्ती व्यक्त ड्रग्ज विकणारी असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे आणि पण दिवाळी झाल्यानंतर आपण बॉम्ब फोडणार आहोत, आपण काचेच्या घरात राहत नाही, ज्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत अशा लोकांनी आपल्यासोबत बोलू नये, असा टोला त्यांनी मलिक यांना लगावला. यासंदर्भातील पुरावेही सादर करु असे सांगत ते पुरावे शरद पवार यांच्याकडे पाठवणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले आहे. सुरुवात नवाब मलिक यांनी केली आहे, पण शेवट आपण करु असा इशाराही फडणवीस यांनी केला आहे.
SD Social Media
9850 60 3590