केंद्र सरकारकडून केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधीसाठी (EPFO) वापरल्या जाणारा युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) आणि आधार कार्ड (Aadhaar number) लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. त्यानुसार आता नोकरदारांना या दोन्ही गोष्टी लिंक करण्यासाठी 1 डिसेंबरपर्यंतचा अवधी मिळाला आहे. यापूर्वी EPFO ने नोकरदारांना या कामासाठी 1 सप्टेंबरपर्यंतचा अवधी देऊ केला होता. त्यानंतर UAN नंबर आणि आधार लिंक नसल्यास पीएफची रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे तुर्तास नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.
पीएफ खाते आधारशी लिंक कसे कराल?
स्टेप-1: ईपीएफओचे अधिकृत संकेतस्थळ www.epfindia.gov.in वर जाऊन लॉग इन करा
स्टेप-2: त्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करा. नंतर ई-केवायसी पोर्टलवर जा. या ठिकाणी link UAN aadhar वर क्लिक करा
स्टेप-3: यूएएन अकाउंटशी नोंदणी झालेला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाइल नंबर अपलोड करा.
स्टेप-4: त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल. हा ओटीपी नंबर बॉक्समध्ये भरा. 12 नंबरचा आधार नंबर टाकून फॉर्म सबमिट करा. आता ओटीपी व्हेरिफिकेशन ऑप्शनवर क्लिक करा.
स्टेप-5: तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडीवर एक ओटीपी येईल. त्याने आधार नंबरला व्हेरिफाय करा. या व्हेरिफिकेशननंतर तुमचे आधार पीएफ अकाउंटशी लिंक होईल.
पॅनकार्ड आधारला लिंक न केल्यास होणार रद्द
पॅनकार्ड आधार कार्डासोबत लिंक न केल्यास भविष्यात तुम्हाला मोठ्या अडचणीचा सामना करावा लागू शकतो. पॅनकार्ड (Pancard) आधारशी न जोडल्यास ते रद्द होईल. तसेच तुम्हाला 1000 रुपयांचा दंडही ठोठावला जाईल.