लॉरी आणि जीप यांच्यात भीषण अपघात, आठ जणांचा जागीच मृत्यू

कर्नाटकमधील चिंतामणी तालुक्यातील माडीकेरे या भागात लॉरी आणि जीप यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल आठ जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. मरिनायकनहल्ली गेटजवळ ही घटना घडली. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असून जखमी प्रवाशांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
8 जणांचा जागीच मृत्यू, आकडा वाढण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटक राज्यातील चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहल्ली या भागात लॉरी आणि जीप यांच्यात भीषण अपघात झाला. जीप लॉरीला धडकल्यामुळे ही घटना घडली. हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच दहा पेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. यातील काही लोक गंभीर जखमीअसल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघाताची दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. चिंतामणी ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार केला जात आहे.

अंबरनाथमध्येही अशीच एक अपघाताची थरारक घटना घडली. अंबरनाथमध्ये आज (12 सप्टेंबर) संध्याकाळी रिक्षा आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक चारही जण उल्हासनगरचे असल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अंबरनाथच्या पालेगाव भागात संबंधित घटना घडली. या अपघातात काहीजण जखमी असल्याची देखील प्राथमिक माहिती आहे. मृतक आणि जखमी अशा सर्वांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस घटनास्थळी आणि रुग्णालयात दाखल झाले आहेत. अपघातग्रस्त वाहनातील नागरिक गणेश विसर्जनासाठी आल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, या माहितीला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

भरधाव डंपरने उडवल्याने दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नालासोपारा पूर्वेकडील सेंट्रल पार्क येथे 6 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली होती. रोहित मिश्रा (24) आणि विनय तिवारी(25) अशी मयत तरुणांची नावे आहेत. हे दोघेही उत्तर प्रदेशातील भधोईया जिल्ह्यातील मूळचे रहिवासी आहेत. हे दोघेही नोकरीच्या शोधात मुंबईत आले होते. याप्रकरणी डंपर चालकाला पोलिसांनी अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.