विमान अपघातात भारतीय वंशाच्या हृदयरोगज्ज्ञाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना कॅलिफोर्निया येथे घडली. मृत्यू झालेल्या डॉक्टरचे नाव डॉ. सुगता दास असून त्यांचा जन्म पुण्यात एका बंगाली परिवारात झाला होता. पुण्यामध्येच त्यांची जडणघडण झाली होती. ते अरिझोना येथे हृदयरोगतज्ज्ञ म्हणून रुग्णांची सेवा करत होते. क्रॅश झालेले विमान डॉ. सुगता दास यांच्याच मालकीचे असल्याची माहिती मिळत आहे. या विमान अपघातात दास यांच्यासोबत आणखी एकाचा मृत्यू झाला तर आजूबाजूच्या घरांनीदेखील पेट घेतला होता. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोमवारी ही हा अपघात झाला.
मिळालेल्या माहितीनुसार डॉ. सुगता दास अरिझोना येथे युमा रिजनल मेडिकल सेंटर येथे (Yuma Regional Medical Center (YRMC) हृदयरोगतज्ज्ञ म्हणून रुग्णांची सेवा करायचे. त्यांच्याकडे Cessna C340 नावाचे छोटे विमान होते. सोमवारी याच विमानातून ते प्रवास करत होते. मात्र, विमानाचा अचानपकणे अपघात झाला आणि ते थेट Santee या भागात कोसळले. या घटनेत त्यांच्यासोबत आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला. हा प्रकार समजताच वायआरएमसीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी भारत मागू (Bharat Magu) यांनी अधिकृत निवेदन जारी केले आहे. यामध्ये त्यांनी दास यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त केली असून त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचे मागू यांनी सांगितले आहे.
दास एचआयव्हीबाधित महिला, मुलांची मदत करायचे
डॉक्टर सुगता दास फक्त एक डॉक्टरच नव्हते तर त्यांनी सामाजिक बांधिलकीदेखील जपलेली होती. त्यांची पॉवर ऑफ लव्ह फाऊंडेशन (Power of Love Foundation) नावाची संस्था आहे. ही संस्था ना नफा ना तोडा या तत्त्वार एचआयव्ही बाधित महिला तसेच मुलांची मदत करते. समाजकार्य करणारा एक हुशार डॉक्टर आमच्यातून गेल्याची भावना त्यांच्या सहकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, Cessna C340 या विमान अपघातामध्ये दास यांचा तसेच आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन घरांनीदेखील पेट घेतला. तसेच या दुर्घटनेत इतर पाच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. या दुर्घटनेत काही वाहनांनीदेखील पेट घेतला होता. मात्र, अग्निशमन दल गटनास्थळी वेळेवर पोहोचल्यामुळे आग विझवण्यात आली आणि अनर्थ टळला.