दिवाळीत घरीच बनवा आयुर्वेदिक उटणे, त्वचेसह आरोग्यालाही होतील हे फायदे

दिवाळी सण अगदी काही दिवसांवर आला आहे. धनत्रयोदशीपासून ते भाऊबीजपर्यंत पाच दिवस साजरा केला जाणारा हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. दिवाळीत उटणे लावून आंघोळ करण्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक जण दिवाळी उटणे लावून अभ्यंग स्नान करतात. दिवाळी आली की बाजारात मोठ्या प्रमाणात उटणे उपलब्ध होते. परंतु यातील काही उटण्यांमध्ये केमिकल्स देखील मिळलेले असतात. त्यामुळे तुम्ही घरी उटणे तयार केल्यास ते अधिक फायदेशीर ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला घरीच उटणे कसे बनवावे आणि त्याचे काय फायदे असतात हे सांगणार आहोत.

उटण्याचा वापर सौंदर्यासाठी पुरातण काळापासून केला जात आहे. राजा-महाराजांपासून ते सामन्य लोक देखील उटण्याचा उपयोग करत होते. उटणे हे उयुर्वेदिक असते आणि त्यात वापरले जाणाऱ्या घटकांमुळे ते त्वचेसाठी अतिशय लाभदायक ठरते. उटणे तयार करण्यासठी वेगवेगळे आयुर्वेदिक घटक आणि सुगंधी तेलाचा वापर केला जातो. यामुळे त्वचा ताजीतवाणी आणि चमकदार बनते.

उटणे तयार करण्यासाठी लागणारे साहित्य कोणत्याही घरात सहज उपलब्ध असते. सुगंधी उटणे तयार करण्यासाठी दूध, बेसन पावडर, हळद, क्रिम, लिंबाचा रस, तिळ आणि गुलाब जल वापरले जाते. यात अनेक जण आणखी काही वेगवेगळ्या घटकांचा वापर करतात. यामुळे ते त्वचेसाठी आणखी लाभदायक बनते. हे सर्व घटक बारिक करून त्यांची पेस्ट तयार केली जाते आणि ती आंगावर लावून आंघोळ केली जाते. यामुळे त्वचा मऊ आणि ताजी बनते.

उटणे लावण्याचे फायदे

– उटणे लावल्याने अनेक फायदे होतात. आयुर्वेदानुसार प्रत्येकाने शरीरातील दोषांचा विचार करून उटण्याचा वापर करावा. शरीरातील दोष लक्षात घेऊन तयार केलेले उटणे त्वचेची पीएच लेव्हल संतुलीत ठेवण्यास मदत करते.

– वात दोष असलेल्या व्यक्तीसाठी तयार केलेले उटणे त्वचेला पोषण देते आणि सामान्य तापमानावरच तुम्ही ते वारु शकता. हे उटणं तुम्हाला लठ्ठपणाचा त्रास असल्यास देखील उपयुक्त ठरते.

– पित्त दोष असणाऱ्यांसाठी तायर करण्यात येणारे उटणे हे थंड तापमाणात लावावे. हे उटणे शरीरातील उष्णता बाहेर काढून टाकण्यास उपयुक्त ठरते. तसेच त्वचेवर मुरुम किंवा पुरळ असतील तर ते दूर करण्यासाठी देखील हे उटणे अतिशय उपयुक्त असते.

– याशिवाय कफ दोष असणाऱ्या व्यक्तिसाठी तयार केलेले उटण्यात गरम तेल घालून मिक्स करावे. हे उटणे शरीरातील कफसारख्या समस्या दूर करते आणि शरीरातील सर्वात आवश्यक लिक्विडचा प्रवाह सामान्य करण्यास मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.