ओव्हरटेकच्या नादात बस आणि ट्रकचा बडोद्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुजरातमधील बडोद्याजवळ ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. मुंबईहून ही बस राजस्थानमधील भीलवाडा इथं जात होती. भरधाव बस बडोद्याजवळ पोहोचली असता ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रकवर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यात बसचे मोठे नुकसान झाले आहे. बसच्या ड्रायव्हरच्या बाजूचा भाग पूर्णपणे कापला गेला आहे. स्लीपर कोच ही बस होती. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींवर उपचार सुरू आहे. काही जखमींना सयाजी रुग्णालयात दाखल केले आहे.