राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहे. पण आता शिवसेनेपाठोपाठ भाजपनेही संभाजीराजे यांची वाट आणखी बिकट केली आहे. राज्यसभेसाठी भाजप तिसरी जागा लढण्याची शक्यता आहे. राज्यसभेसाठी पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा होत आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढली आहे. भाजपने आता संख्याबळ नसतानाही तिसरी जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपकडून पियूष गोयल, विनोद तावडे, हर्षवर्धन पाटील आणि धनंजय महाडिक यांच्या नावाची चर्चा आता रंगली आहे. विशेष म्हणजे, तिसऱ्या जागेसाठी भाजपला 13 मते कमी पडत आहे. पण, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठी लागणाऱ्या मतांसाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.