भाजप नेते नारायण राणे यांची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही दाखवली? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” अशा शब्दात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र डागलं. तर, नारायण राणेंना अटक करुनच दाखवा, तुमच्यात हिंमत नाही, असं म्हणत भाजप नेते प्रमोद जठार यांनी ठाकरे सरकारला पुन्हा ललकारलं.
“हा राजकीय द्वेषापोटी सत्तेचा दुरुपयोग आहे. नारायण राणेंची बोलण्याची स्टाईल आहे. अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक? हे काय चाललंय? प्रत्येक शिवसैनिकाविरोधात खंडणी, बलात्काराचे गुन्हे दाखल होत आहे. त्यावेळी तत्परता का नाही? केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक हे सुडापोटी चालू आहे. त्यावरुन जे काय होईल त्याला जबाबदार सत्ताधारी असतील” असा इशारा चंद्रकांतदादांनी दिला.
“प्रत्येकाची स्टाईल असते, त्यात व्यक्तिगत असूया नसते. पण अशा एखाद्या वाक्यावरुन केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना अटक करण्याची ही पहिलीच वेळ असू शकते. मी त्याचं समर्थन करत नाही. कोकणात शिव्यांशिवाय बोलणंच पूर्ण होत नाही. ते असूयेपोटी नसतं, रागापोटी नसतं” असा दावा पाटलांनी केला.
“राणे ‘मारतो’ म्हणाले नाहीत, ‘मारणार आहे’ ही धमकी असते, न्यायालयात ही गोष्ट टिकणारच नाही. राणे तसे म्हणालेच नाहीत. ‘मी असतो तर’ असं ते म्हणाल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
स्वत: उद्धवजींनी दसऱ्याला केलेलं भाषण बघा, राजकारणात भाषा सांभाळून वापरावी हे खरं आहे. त्यामुळे अशा एखाद्या वक्तव्यावरुन टोक गाठणं चुकीचं आहे. उद्धवजींची भाषणं काढा, असं चॅलेंजच चंद्रकांत पाटील यांनी दिलं.
नाशिक पोलीस आयुक्तांनी काढलेले आदेश म्हणजे हास्यास्पद आहे. मला वाटतं आणखी काही घडणार असेल तर ते डायवर्ट करण्याचा प्रयत्न आहे. केवळ उद्धवजींचा भाषणाचा उल्लेख हे वैयक्तिक आहे. शब्द जपून वापरलं पाहिजे हे खरंय, मग हे सगळ्यांनाच लागू आहे, असंही चंद्रकांतदादा म्हणाले.
जन आशिर्वाद यात्रा निघणार. न्यायालयात हे दोन सेकंदात उडणार. हे सगळं भीतीपोटी झालं आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राणे साहेब जात आहेत. कोकणात शिवसेनेचं वर्चस्वाला हादरा बसत आहे. नारायण राणेंना अटक होईल असं वाटत नाही. न्यायालय योग्य निर्णय देईल. यात्रा सुरु राहील. दोन्ही कार्यकर्ते आमने सामने आले तर ही जबाबदारी प्रशासनाची. एखाद्या वाक्यावरुन टोक गाठायचं असेल तर शासनाच्या मनात असंतोष निर्माण करण्याचं आहे हे दिसतंय.