शेतकऱ्यांना अस्मानी आणि सूलतानी संकटाचा दरवर्षीच सामना करावा लागतो. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडत असतो. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सरकार नेहमीच विविध योजना आणत असते. आता वर्षभरासाठी बंद करण्यात आलेली ही योजना पुन्हा सूरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
बिहार सरकारने गेल्या वर्षी बंद केलेली योजना पुन्हा सूरू करण्याचा निर्णय घेतला आहे.यासाठी सरकारने 100 कोटींचा प्लान ही बनवला आहे. या योजनेतर्गंत आता सरकारी तिजोरीतून 80 मशिन्स खरेदीवर शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे.
शेतीच्या यंत्रांवर अनुदान देण्याची योजना गेल्यावर्षी बंद केल्यानंतर आता ती पुन्हा एकदा सूरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. केंद्राकडूनही शेतकऱ्यांना अनेक लाभ मिळत आहेत, मात्र तरीही शेतकरींचे आर्थिक संकट काय कमी होत नव्हते.
त्यामुळे राज्य सरकारतर्फे सुद्धा जूनी योजना सूरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आताच्या या योजनेत फक्त अनुदानच मिळणार असे नाही आहे, तर यंत्रांची संख्या देखील 80 करण्यात आली आहे. तर खर्चाच्या 50% अनुदान म्हणूनही दिले जाणार आहे.
नवीन मशीन्समध्ये, सरकारचा सर्वात जास्त भर जमीनीवर काम करणाऱ्या व शेतकऱ्यांचे कष्ट कमी करण्यावर आहे. याशिवाय ऊस गाळप यंत्रावरही अनुदान दिले जाणार आहे.
उद्यानाशी संबंधित काही नवीन उपकरणांचाही यावेळी अनुदान यादीत समावेश करण्यात आला आहे.विशेष म्हणजे नवीन योजनेत शेतकऱ्यांना नवीन यंत्राबाबतची ट्रेनिंगही देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.