पंजाबने केला गुजरातचा लाजीरवाणा पराभव

आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सर्वात यशस्वी ठरलेली टीम गुजरात आहे. प्लेऑफमध्ये ही पहिली टीम पोहोचली आहे. मात्र पंजाब विरुद्धच्या सामन्यात ज्याची भीती होती तेच घडलं. गुजरातनं सामना गमवला. पंजाबने 8 विकेट्सने सामना जिंकला आहे. आतापर्यंत गुजरातचा हा सर्वात लाजीरवाणा पराभव आहे.

गुजरातने 10 पैकी 8 सामने जिंकले आहेत. तर दोन सामने गमवले आहेत. या सामन्यात स्टार खेळाडू मात्र हिरोचा झिरो बनल्याची चर्चा आहे. एका ओव्हरमध्ये सगळा खेळच बदलला. ज्यामुळे तो टीमसाठी व्हिलन बनला. त्याला टीममधून हार्दिक पांड्या बाहेर बसवणार का? अशा चर्चा रंगल्या आहेत.

गुजरात टीमसाठी सर्वात महत्त्वाचा खेळाडू मोहम्मद शमी आहे. मात्र त्याचा सर्वात मोठा फ्लॉप शो पाहायला मिळाला. शमीने पंजाबविरुद्ध वाईटरित्या फ्लॉप झाला. शमीने पहिल्या तीन ओव्हरमध्ये 15 धावा देत 1 बळी घेतला.

शमीने 16 वी ओव्हर टाकली. या षटकात तो चांगली गोलंदाजी करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती, पण उलटच झालं. त्याने आपल्या ओव्हरमध्ये 28 धावा दिल्या. त्यामुळे गुजरातच्या हातून सामना गेला.

कागिसो रबाडाची घातक गोलंदाजी आणि शिखर धवनच्या शानदार फलंदाजीमुळे पंजाब किंग्जने सामना जिंकला. शिखर धवनने या सामन्यात 62 धावांची खेळी केली. लियाम लिविंगस्टोन 10 बॉलमध्ये 30 धावा केल्या. भानुका राजपक्षेने 28 बॉलमध्ये 40 धावा केल्या.

पंजाबच्या गोलंदाजांनी शानदार खेळ दाखवला. या सामन्यात कागिसो रबाडाने 4 विकेट घेतल्या. धवन, लियाम लिविंगस्टोन आणि अर्शदीप सिंग यांनी 1-1 विकेट घेतल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.