सीबीएसई बोर्डानं बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा ऑनलाईन घ्याव्यात यासाठी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी सोशल मीडियावर बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी मागणी करत आहेत. विद्यार्थ्यांनी आता Cancel CBSE 12th Exam हा ट्रेंड चालवत आहेत. तर, काही विद्यार्थी परीक्षा ऑनलाईन घेण्याची मागणी करत आहेत. मोठमोठ्या देशांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा होत आहेत. विद्यार्थ्यांनी सीबीएसई बोर्डाच्या नव्या तारखेची प्रतीक्षा आहे.
सीबीएसई बोर्डाचे बारावीचे विद्यार्थी आणि पालक चिंतीत आहेत. सीबीएसई बोर्डाकडे ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा आयोजित करण्याचा पर्याय आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीनं घेतल्या जाणाऱ्या परीक्षेमध्ये वीज पुरवठा खंडित होणं, ग्रामीण भागात इंटरनेट नेटवर्क,इंटरनेट स्पीड, मोबाईल, लॅपटॉपची उपलब्धता, अशा समस्या आहेत. सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत 1 जूनला आढावा घेतला जाणार आहे. कोरोना परिस्थिती आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करण्यासाठी 15 दिवसांचा वेळ मिळेल, असा वेळ देऊन परीक्षेची तारीख जाहीर करु, असं रमेश पोखरियाल निशंक म्हणाले होते. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी सीबीएसई बोर्ड अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे एक कार्यप्रणाली ठरवेल. त्यानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना गुण देणार असल्याचे जाहीर केले. ज्या विद्यार्थ्यांना गूण मान्य नसतील त्यांची कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर परीक्षा घेऊ, असं पोखरियाल म्हणाले होते.