पूर्व पाकिस्तानला वेगळे करण्याचा निर्णय 1965 पासून घेतला होता : अनिल कुमार चावला

भारताने पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तानापासून वेगळं करण्यात प्रमुख भूमिका बजावली होती. पाकिस्तानचा पूर्व भाग स्वतंत्र झाला आणि बांग्लादेशची निर्मिती झाली. “जरी पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तानापासून प्रत्यक्षात 1971 मध्ये वेगळे करण्यात आले तरी या दोन भागांना वेगळं करण्याचा विचार भारताने 1965 पासूनच सुरू केला होता,” असं दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ व्हाईस अॅडमिरल अनिल कुमार चावला यांनी स्पष्ट केलं.

1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या विजयाचा सुवर्णमहोत्सव साजरा करताना येलहंका इथल्या एअर फोर्स स्टेशन येथे झालेल्या संमेलनात अनिल कुमार चावला बोलत होते. “हे केवळ आंतर-सेवा सहकार्य (inter-service collaboration) नव्हते तर एका उत्तम नेतृत्वाखाली संपूर्ण सरकारचा दृष्टिकोन होता,” असे चावला यांनी सांगितले. चावला सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले की आता शत्रू वेगळे आहेत, युद्ध वेगळे आहे आणि तंत्रज्ञानाने सर्व काही बदलले आहे. आपल्याला पुढे बघण्याची गरज आहे.

अनेक ‘अवर्गीकृत’ कागदपत्रे (declassified documents) अहेत जे हे सिद्ध करतात की पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तानापासून वेगळं करण्याचा विचार भारताने 1965 च्या युद्धानंतर सक्रियपणे सुरू केला होता. याचं प्रमुख कारण म्हणजे आयएसआयने (ISI) भारताच्या ईशान्य भागात बंडखोरांना बळ देणे, खासकरून चितगांवच्या (Chittagong) डोंगराळ भागात नागा बंडखोरांना शस्त्र आणि प्रशिक्षण देणे. आम्ही “मुक्त वाहिनीला” प्रशिक्षण देताना हे धडे वापरले, असं चावला यांनी सांगितले.

पण, भारत त्यावेळी कमजोर झालेला होता. कारण काँग्रेस पक्षाचे विभाजन झाले होते आणि इंदिरा गांधीना पंतप्रधान होऊन जेमतेम काही दिवस झाले होते. चावला पुढे म्हणाले की. इंदिरा गांधींना विरोधक ‘गुंगी गुडिया’ म्हणत होते आणि विरोधकांना त्या जास्त काळ टिकतील अशी अपेक्षा नव्हती. त्या दरम्यान पाकिस्तानमध्ये याह्या खान यांनी 1969 मध्ये टिक्का खान यांच्याकडून पदभार स्वीकारला होता.

याह्या खान यांनी खरंतर या सगळ्याची सुरूवात केली. त्यांनी 1954 चा “एक युनिट भू -राजकीय कार्यक्रम” (one unit geopolitical programme) थांबवला आणि 1970 मध्ये निवडणुका लावल्या. 1970 च्या निवडणुका पाकिस्तानमधील पहिल्या एक-व्यक्ती, एक मताच्या (one-person, one-vote) निवडणुका होत्या. इंदिरा गांधींनी त्या वर्षी फेब्रुवारी 1971 च्या नियोजित निवडणुका दीड वर्ष आधीच घेण्याचे ठरवले.

याह्या खान तेव्हा मजबूत होते आणि इंदिरा गांधी कमकुवत होत्या. मात्र 1970 मध्ये चित्रं पूर्ण पालटले. पूर्व पाकिस्तानात शेख मुजीबूर रहमान यांना 160 तर पश्चिम पाकिस्तानात भुट्टो यांना केवळ 81 जागा मिळाल्या, असं त्यांनी सांगितलं.

पूर्व पाकिस्तानला पश्चिम पाकिस्तानापासून वेगळं करण्यासाठी 30 जानेवारी 1971 च्या घटनेने खरी चालना दिली असावी. त्या दिवशी काश्मिरी फुटीरतावाद्यांनी लाहोरला इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे अपहरण झाले होते. भारत सरकारने पश्चिम पाकिस्तानला रोखण्यासाठी ओव्हरफ्लाइट (overflight) सुविधा बंद केल्या. त्यांना पूर्व पाकिस्तानात कोलंबोवरून उड्डाण करावे लागले, जे कठीण आणि खर्चिक होते. दरम्यान रहमान यांनी निवडणुक जिंकुनही त्यांना पंतप्रधान होणे कठीण जात होते आणि सगळं चित्र बदलत गेले. शेवटी मार्च 1971 मध्ये रहमान यांनी स्वातंत्र्य घोषित केले आणि भारत एप्रिल 1971 मध्ये युद्धात उतरला, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.