शिंदे सरकार देणार वीजेचा झटका, महिन्याचे वीज बिल 200 रुपयांनी महागणार

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार आणखी एक झटका बसणार आहे. राज्यात पुन्हा एकदा वीज दरवाढ होणार आहे. किमान 60 पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्याचे वीज बिल किमान 200 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिश्याला पुन्हा कात्री लागणार आहे.

महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला आता शिंदे सरकार पुन्हा एकदा झटका देणार आहे. राज्यात विजेच्या दरात 10 ते 20 टक्के वाढ करण्याचा निर्णय शिंदे सरकारने आधीच घेतला आहे. आता नोव्हेंबर महिन्यात पुन्हा दरवाढ होणार आहे. वीज खरेदी खर्चातील वाढीपोटी महावितरणने 1500 कोटी रुपये राखीव ठेवले होते. तो निधी 2021 मध्येच संपला आहे. त्यामुळे महावितरणने 1 एप्रिल 2022 मध्ये खरेदीच्या वाढीपोटी इंधन समायोजन शुल्क आकारण्यास सुरुवात केली.

सध्या हे शुल्क १.३० रुपये प्रति युनिट इतके आहे. आता पुढील महिन्यात महावितरण 60 ते 70 पैशांची वाढ करणार आहे. त्यामुळे इंधन शुल्कचा दर हा 2 रुपयांपेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे.वीज खरेदीपोटी महावितरणला जवळपास ४० हजार कोटी रुपयांची वसुली गरजेची आहे. त्यामुळे वीज दरवाढ केली जाणार आहे. राज्यात महानिर्मिती 7 औष्णिक वीज प्रकल्पांमधून 30 संचांद्वारे वीजनिर्मिती करत असते. सप्टेंबर अखेरपर्यंत कंपनीला 34 हजार 806 कोटींचा वीज खरेदी खर्च आला. त्यामुळे आता याचा खर्च आता सर्वसामान्यांकडून वसूल केला जाणार आहे.

उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढली असताना कोल इंडियाकडून फक्त 20 टक्के कोळसा पुरवण्यात आला होता. त्यामुळे महानिर्मितीला बाहेरून कोळसा खरेदी करावा लागला. त्यासाठी 20 हजार कोटींचा खर्च आला. तसंच क्रॉस सबसिडीतील पैसादेखील कोरोना काळात मिळाले नाही. त्यामुळे आणखी 20 हजार कोटींचे नुकसान झाले आहे, त्यामुळे किमान 40 हजार कोटींच्या घरात नुकसान झाले आहे, अशी माहिती ज्येष्ठ वीज तज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना सांगितलं.

महावितरणकडून जुलैपासून 1.35 रुपये प्रति युनिट वाढ करण्यात आली असून इंधन दर आकारला जात आहे. ही मुदत नोव्हेंबर महिन्यात संपणार आहे. आता हा आकार 1.90 रुपये असू शकतो. इंधन समायोजन आकार वाढवला नाहीतर तर पुढील वर्षी वीज दरवाढ अटळ असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.