गेल्या दोन दिवसापासून राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यात देखील या पावसामुळे शेतीचे जवळपास साडेचार हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून जळगाव शहर आणि जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस झाला आहे. वादळामुळे अनेक ठिकाणी मोठे वृक्ष उन्मळून पडले आहेत. गहू हरभरा आणि कांदा या पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. रावेर चाळीसगाव जळगाव बोदवड या तालुक्यांमध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. 24 मार्च पर्यंत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कापणी वर आलेल्या गहू या पिकाचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले असून प्राथमिक अहवालानुसार बोदवड 92 हेक्टर, चाळीसगाव 1801 हेक्टर, जळगाव 1902 हेक्टर असे शेतीचे नुकसान झाले आहे.