अभिषेक आणि ऐश्वर्या यांची जोडी प्रत्येकासाठी एक उत्तम उदाहरण आहे. इतक्या वर्षांनंतरही दोघांनी आपले नातं टिकवून ठेवले आहे. दोघांनी त्यांचे सुखी वैवाहिक जीवन कसे टिकवून ठेवले, याबद्दल सगळ्यानांच उत्सुकता आहे. चला तर, मग या दोघांच्याही सुखी वैवाहिक आयुष्याचे रहस्य जाणून घेऊया…
अभिषेक आणि ऐश्वर्या नेहमीच एकमेकांच्या गुणवत्तेचे कौतुक करतात. जसे ऐश्वर्याला आवडते की, अभिषेक लहानपणापासूनच शोबिझचा एक भाग आहे आणि जबाबदारीने तो पुढे जातो. याशिवाय या गोष्टीबद्दल तो कधीही बडेजावदेखील मिरवत नाही. तो आपल्या कामावर लक्ष केंद्रित करतो आणि आपले नाव कमावण्यासाठी कठोर परिश्रम करतो. ऐश्वर्याला त्याचे हेच गुण आवडतात. ऐश्वर्याने एका मुलाखतीत म्हटले होते की, अभिषेक खूप खास आहे कारण त्याचे स्वतःचे एक सुंदर व्यक्तिमत्व आहे. मी भाग्यवान आहे की, तो माझा नवरा आहे. त्याचवेळी अभिषेकने एका मुलाखतीत सांगितले की, ऐश्वर्या सर्व देखभाल व्यवस्थित करते. ती तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यातील सर्व जबाबदाऱ्या अतिशय चांगल्या प्रकारे पार पाडते. कामाबद्दलच्या तिच्या समर्पणावर कोणीही प्रश्न विचारू शकत नाही. ती एक आई म्हणून खूप हुशार आहे. ती एक सुपर आई आहे आणि एक सह-कलाकार म्हणून मला तिच्याबरोबर काम करायला आवडते.
ऐश्वर्याने एकदा सांगितले होते की, ती अभिषेककडून खूप प्रेरित आहे. ती म्हणाली होती की, अभिषेक खूप सापोर्टिव्ह आहे. जेव्हा जेव्हा मी गोंधळून जाते आणि काय करावे हे समजत नाही, तेव्हा मी अभिषेककडे पाहते आणि तो माझा सर्व संभ्रम लगेच दूर करतो
कपिल शर्मा शोमध्ये ऐश्वर्याने सांगितले होते की, भांडण झाल्यास त्या दोघांपैकी आधी कोण माफी मागतं. वास्तविक कपिलने विचारलेले की, तुमच्यात आणि अभिषेकमध्ये भांडण होते का? तर ऐश्वर्याने उत्तर दिले होते, हो बऱ्याचदा… मग कपिलने विचारले की, कोण प्रथम सॉरी बोलतं? यानंतर ऐश्वर्याने उत्तर दिले की ‘मी प्रथम सॉरी म्हणते आणि विषय संपवते.’
एकदा या दोघांमधील नात्याबद्दल जेव्हा काही अफवा उद्भवल्या, तेव्हा अभिषेक थेट म्हणाला की, तो आपली पत्नी ऐश्वर्या हिच्यावर किती प्रेम करतो, हे फक्त आम्हालाच माहित आहे. तो म्हणाला होते की, ‘मी कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला आपले संबंध बिघडवू देणार नाही.’