आज ‘दबंग’ गर्ल सोनाक्षी सिन्हा चा वाढदिवस

सोनाक्षी सिन्हाचे वडील शत्रुघ्न सिन्हाची इच्छा नव्हती की त्यांच्या मुलीने चित्रपटात अभिनय करावे, सोनाक्षीने आपल्या वडिलांना सांगितले होते की ती आपल्या परिवाराच्या मान-सन्मानाचे पूर्ण लक्ष्य ठेवेल. म्हणून तिने अद्याप एकाही चित्रपटात बिकनी घातली नाही आणि चुंबन दृश्य देखील दिले नाहीत. ती चित्रपट साइन करण्याअगोदर ही गोष्ट निर्माता-निर्देशकाला स्पष्ट सांगून देते. ‘दबंग’मध्ये तिला एका गावकरी मुलीचे अभिनय करण्यासाठी आपले वजन तीस किलो कमी केले होते. ती मॅक्सीम मॅगझिनच्या इंडियन अंकात कव्हर गर्ल बनली होती. सोनाक्षीचा जन्म पटना येथे झाला आणि तिचे शिक्षण मुंबईत झाले आहे. सोनाक्षीला प्रेमाने ‘सोना’ आणि ‘शॉटगन ज्युनियर’ म्हणून हाक मारतात. सोनाक्षीला फोटोग्राफीची फारच आवड आहे, तसेच तिला फिरायला देखील आवडते. सोनाक्षी गाणंपण म्हणते. चित्रपट ‘रियो 2’ मध्ये ‘ज्वेल’ नावाच्या पात्रासाठी तिने गाणे म्हटले आहे. तसेच आवाजही दिला आहे. सोनाक्षीने फॅशन डिजाइनिंगमध्ये ग्रॅज्युएट केले आहे. तिने आपले कॅरियर कॉस्ट्यूम डिजाइनरच्या रूपात सुरू केले होते. तिनी २००५ मध्ये चित्रपट ‘दिल लेके देखो’साठी कॉस्ट्यूम डिझाइन केले होते. सोनाक्षी सिन्हाने ‘राइझ ऑफ गॉर्डियंस’च्या हिंदी वर्जनमध्ये टूथ कॅरेक्टरसाठी आवाज दिले होते. त्याशिवाय ‘वॉइस ऑफ ज्वेल’च्या हिंदी वर्जन ‘रिओ 2’साठी सोनाक्षीने डबिंग केले होते. सोनाक्षी सिन्हा ‘यूनाइटेड सिंग्स’ नावाच्या कबड्डी टीममध्ये यूनाइटेड किंगडमची कंपनी ‘हायरे ग्रुप’सोबत भागीदारीत मालकीनं आहे. सोनाक्षीचा साधेपणा आणि तिच्या डोळ्यांची चमक तिच्या यशाचे रहस्य आहे. ‘दबंग’ आणि ‘राउडी राठौर’ तिचे आतापर्यंतचे नायक प्रधान अँक्शन चित्रपट होते पण सोनाक्षीने यात आपला प्रभाव दाखवला होता.

संजीव वेलणकर, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.