माणसाच्या उत्क्रांती आधी पृथ्वीवर महाकाय डायनासॉर होते ही गोष्ट आपल्याला माहित आहे. शातच शास्त्रज्ञांना दक्षिण चीनमध्ये डायनासोरच्या अंड्याचा एक जीवाश्म सापडला आहे, ज्यामध्ये डायनासोरचं भ्रूण जतन करुन ठेवण्यात आले आहे. हे अंड 66-72 मिलियन (7 कोटी 20 लाख) वर्षांपूर्वीचं आहे. सापडलेल्या या भ्रूण ‘बेबी यिंगलियांग’(Baby Yingliang) या नावानं ओळखलं जाणार आहे. अशी माहिती समोर येत आहे. हा भ्रूण दक्षिण चीनमधील जिआंग्झी प्रांतातील गांझू शहरातील शाहे इंडस्ट्रियल पार्कमध्ये ‘हेकोऊ फॉर्मेशन’च्या खडकांच्या खाली आढळला आहे.
डेलीमेलनं दिलेल्या वृत्तानुसार, बेबी यिंगलियांग अंड्यातील भ्रूण पूर्णपणे वाढ झालेलं आहे. त्याचं डोकं शरीराच्या खाली होतं, त्याची पाठ अंड्याच्या आकारानुसार वळालेली होती आणि त्याचे पाय डोक्याच्या दिशेला होते. ओविराप्टोरोसॉर (oviraptorosaurs) हे 6.7-इंच लांब अंड्याच्या आत विकसित होऊ शकतात, त्यानंतर जन्माला आल्यावर डोक्यापासून शेपटीपर्यंत सुमारे 10.6 इंच लांब असू शकतात.
बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीच्या जीवाश्मशास्त्रज्ञांनी सांगितलं की, हा भ्रूण ओविराप्टोरोसॉर प्रजातीचा आहे, ज्याला दात आणि चोच नव्हती. ओविराप्टोरोसॉर पंख असणारे डायनासोर होते, जे आशिया आणि उत्तर अमेरिकेतील पर्वतरांगांमध्ये आढळून येत होते. या डायनासोरचा गर्भ अगदी एखाद्या पक्षाच्या गर्भासारखाच दिसून येतो. हा भ्रूण (embryo)विकासाच्या अवस्थेतील एखाद्या पक्ष्यांपेक्षा फारसा वेगळा दिसत नाही. त्यांची चोच आणि शरीराचा आकार वेगळा असायचा. हा भ्रूण आतापर्यंत सापडलेला सर्वात ‘पूर्णपणे ज्ञात डायनासोर भ्रूण’ आहे.