मुंबई-आग्रा महामार्गावर धुळे जिल्ह्यात भीषण अपघात झाला आहे. तीन गाड्या एकमेकांना धडकल्याने झालेल्या अपघातात दोन गाड्यांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 9 जण जखमी झाले आहेत. धुळे जिल्ह्यात मुंबई-आग्रा महामार्गावर मित्रनगर जवळ हा भीषण अपघात झाला आहे.
धुळे जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. ट्रक, अॕपे रिक्षा आणि क्रूझर गाड्या एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, रिक्षा आणि क्रूझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मदतीसाठी धाव घेतली.