खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक असलेल्या ICICI बँकेने पुन्हा एकदा 2 कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. बँकेने सांगितले आहे की 290 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंत मॅच्युरिटी असलेल्या एफडीवर व्याजदर वाढवले जात आहेत. नवीन दर 16 मे 2022 पासून लागू झाले आहेत.
ICICI बँकेने विविध मुदतीच्या ठेवींवरील व्याजदरात 10-20 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. 7 दिवस ते 29 दिवसांच्या ठेवींवर 2.5 टक्के आणि 30 दिवस ते 90 दिवसांच्या ठेवींवर 3.5 टक्के व्याजदर असेल. 185 दिवसांपासून ते 289 दिवसांपर्यंतच्या FD वर कोणताही बदल न करता 4.4 टक्के व्याजदर राहील.
हे आहेत नवीन दर
290 दिवस ते एक वर्षाच्या ठेवींवरील व्याजदर 4.4 टक्क्यांवरून 4.5 टक्के करण्यात आला आहे. त्यात 10 बेसिक पाँईंट्सची वाढ झाली आहे. तर 1 ते 2 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर, बँकेने व्याजदर 10 बेस पॉइंट्सने वाढवून 5.1 टक्के केला आहे. 2 वर्षे 1 दिवस ते 3 वर्षे कालावधीच्या मुदत ठेवींवरील व्याजदरात 20 आधार अंकांनी वाढ करण्यात आली आहे. तो 5.2 टक्क्यांवरून 5.4 टक्क्यांवर पोहोचला आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिक व्याज
बँक आता 3 वर्षे 1 दिवस ते 5 वर्षे कालावधीच्या ठेवींवर 5.6% व्याज देत आहे. त्यात 15 बेसिक पाँईट्सची वाढ झाली आहे. बँक आता 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे मुदत ठेवींवर 5.75 टक्के व्याज देईल. यामध्ये 15 बेसिस पॉइंट्सची वाढ करण्यात आली. त्याच वेळी, आता 1.5 लाख रुपयांपर्यंतच्या कर बचत एफडीवर 5.6 टक्के व्याज मिळेल. ज्येष्ठ नागरिकांना 7 दिवसांपासून ते 5 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर अर्धा टक्का अधिक व्याज मिळत राहील.
ICICI बँक त्यांच्या गोल्डन इयर्स एफडीवर 6.35 टक्के व्याज देत आहे. 5 वर्षे 1 दिवस ते 10 वर्षे कालावधीच्या विशेष FD योजनेला गोल्डन इयर्स FD म्हणतात. विशेष एफडीचा हा दर 7 ऑक्टोबर 2022 पर्यंत आहे.