हुपरी येथील प्रसिद्ध चांदीचे व्यापारी अमोल बजरंग माळी (वय 55) मंगळवारी पहाटे डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. दम्याचा त्रास होत असल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते.
प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच अमोल बजरंग माळी यांना कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचारही सुरु होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले होते. मात्र, त्यांना आधीपासून असणारी दम्याची व्याधी बळावल्याने अमोल माळी आयुष्याला कंटाळाले होते. याच नैराश्यातून त्यांनी आज पहाटे आपल्या निवासस्थानी डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.
अमोल माळी हे इचलकरंजीमधील प्रसिद्ध चांदी उद्योजक होते. या परिसरात त्यांच्या व्यवसायाचा मोठा पसारा होता. अमोल माळी यांच्या बेडरुममधून गोळी झाडल्याचा आवाज येताच कुटुंबीयांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत अमोल माळी यांचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येत याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. तर शहरातील व्यापाऱ्यांनी अमोल माळी यांच्या अंत्यदर्शनासाठी गर्दी केली आहे.