‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही कॉमेडी शोमध्ये आपल्या अनोख्या स्टाइलने सर्वांची मने जिंकणारी दया बेन म्हणजेच दिशा वकानी आणि तिचे काम सर्वांनाच आवडले आहे. या शोमधील प्रत्येत पात्रांचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग आहे आणि या शोमधील प्रत्येक कलाकारांनी लोकांच्या मनात असं काही घर केलं आहे की, त्यांना मानतून काढून टाकणं शक्य नाही. शोमधील दिशा वकानी म्हणजेच दया बेनचं व्यक्तीमत्व देखील तसंच आहे. परंतु दिशा वकानीचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून प्रेक्षकांना विश्वास देखील बसणार नाही.
दिशा अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यापासून दूर असली तरी, लोक तिला खूप मिस करतात. अशा परिस्थितीत साध्या दिसणाऱ्या दया बेनचा बोल्ड डान्स व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
दिशा वाकाणीच्या पुनरागमनाची वाट पाहणाऱ्या चाहत्यांमध्ये तिचा एक थ्रोबॅक व्हिडीओ खूप चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की दया बेन उर्फ दिशा वाकानी ‘भिंगरी ग भिंगरी’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.
दिशा वकानीचा हा अवतार चाहत्यांनी याआधी क्वचितच पाहिला असेल, तिचा डान्स आणि स्टाइल दोन्ही खूप वेगळे आहेत. ज्यामुळे व्हिडीओ पाहिल्यावर त्यावर विश्वास ठेवणं देखील कठीण होईल की, हिच ती दिशा वकाणी आहे.
दिशा वाकाणीचे हे व्हिडीओ खूप जुने आहे. दिशा वाकाणीचा हा व्हिडीओ 19 लाख 4 हजार 668 लोकांनी पाहिला आहे. व्हिडीओमध्ये दिशा वकानीने डार्क बीयू शॉट स्कर्ट आणि बिकिनी टॉप घातला आहे. त्या व्हिडीओमधली तिची स्टाइल खूपच किलर आहे. दिशाच्या या जुन्या व्हिडीओमध्ये तिचा खोडकर आणि हॉट बाजू सर्वासमोर आली.