“राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यात घोडेबाजार, आकडे आणि मोड दोन्ही…” म्हणत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय

राज्यसभेच्या सहा जागांसाठी लवकरच निवडणूक  होणार आहे. या सहा जागांसाठी राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग येताना दिसत आहे. सहाव्या जागेवर संभाजीराजे अपक्ष लढणार असल्याची घोषणा केली आहे. तर भाजप कडूनही सहावी जागा लढण्याची तयारी असल्याचं बोललं जात आहे. त्यातच आता शिवसेनेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी छत्रपती संभाजीराजे अपक्ष म्हणून मैदानात उतरले आहेत. इतकेच नाही तर संभाजीराजे यांनी सर्व आमदारांना पत्र लिहून पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. त्याच दरम्यान आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. आपल्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी म्हटलं आहे, शिवसेना सहावी जागा लढवणार आणि जिंकणार सुद्धा.

“आकडे आणि मोड दोन्ही मविआकडे…”

राज्यसभेच्या 6 व्या जागेसाठी महाराष्ट्रात घोडेबाजार सुरू करण्याची विरोधकांची इर्षा दिसू लागलीय.. भ्रष्टाचारातून पैसा .. त्यातून घोडेबाजार!हे दुष्ट चक्र कधी थांबेल? सहावी जागा शिवसेना लढेल. कोणी कितीही आकडे मोड करावी.. आकडे आणि मोड दोन्ही महविकास आघाडीकडे आहे. लढेंगे. जितेंगे. असं ट्विट करत संजय राऊत यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवर शिवसेना उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

सध्या महाविकास आघाडीकडे 169 आमदार आहेत. शिवसेना 55, राष्ट्रवादी 54, काँग्रेस 44, इतर पक्ष 8 आणि अपक्ष 8 असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे 113 आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे 106 आमदार, रासप 1, जनसुराज्य 1 आणि अपक्ष 5 आमदार अशा एकूण 113 आमदार भाजपकडे आहेत.

राज्यसभेच्या एका जागेसाठी 42 मतांची गरज असते. महाविकास आघाडीकडे 169 आमदार आणि भाजपकडे 113 आमदार आहेत. संख्याबळानुसार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार सहज राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. तर भाजपचे दोन उमेदवार राज्यसभेवर जाऊ शकतात. तिसरी जागा भाजपनं लढवल्यास फोडाफोडी करावी लागू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.