जन्म.८ जून १९७५
शिल्पा शेट्टी अभिनेत्री बरोबरच एक यशस्वी बिझनेस वूमन म्हणून ओळखली जाते. शिल्पाने सेंट एन्थोनी हाईस्कूल मधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. नंतर पोद्दार कॉलेज माटुंगा मधून आपले उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानी भारतीय क्लासिकल डान्स प्रकार भरत नाट्यम मध्ये निपुणता मिळवली आहे. शालेय काळात ती त्यांच्या व्हॉलीबॉल टीमची कप्तान सुद्धा होती. त्यांनी कराटे मध्ये ब्लॕक बेल्ट मिळविला आहे. १९९१ मध्ये १० वी ची परीक्षा दिल्यानंतर त्यांनी मॉडेलच्या रुपात आपल्या करियर ची सुरुवात केली होती. लिम्का टेलीविजन कमर्शियल आणि स्थानिक कमर्शियल सोबत काम केले. जाहिरातींमध्ये काम करता करता त्यांना चित्रपटाचे ऑफर यायला लागले होते.
तिने १९९३ मध्ये आलेल्या शाहरुख खान आणि काजोल स्टारर ‘बाजीगर’ चित्रपटातून डेब्यू केला. लीड रोलमध्ये तिचा पहिला चित्रपट ‘आग’ होता. ‘धडकन’, ‘रिश्ते’ आणि ‘फिर मिलेंगे’ सारख्या चित्रपटांनी तिने नवी ओळख मिळवली. शिल्पाने हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नडमध्ये सुमारे ४० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. शिल्पाने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिलेत. पण आयटम साँग्स आणि ठुमके यासाठी ती जास्त ओळखली गेली. शिल्पा शेट्टीच्या कारकिर्दीत अनेक वाद झाले आहेत. शिल्पाची सर्वात जास्त चर्चा ही अक्षय कुमारच्या रिलेशनशिपमुळे झाली होती. ‘मै खिलाडी तू अनाडी’ या सिनेमाच्या सेटवर अक्षय व शिल्पा यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. ‘धडकन’ मध्ये अक्षय व शिल्पाने एकत्र काम केले. त्यादिवसांत हे दोघेही लग्न करणार, अशी चर्चा सुरु झाली. पण एका मॅगझिनने ही बातमी छापल्यावर शिल्पा इतकी नाराज झाली होती की, तिने या मॅगझिनविरोधात केस ठोकली होती. २००३ मध्ये शिल्पा व तिच्या कुटुंबावर अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप झाला होता. अर्थात शिल्पाच्या आईवडिलांनी या आरोपाचा इन्कार केला होता. शिल्पाची प्रतीमा खराब करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले होते. २००६ मध्ये शिल्पावर अश्लिलता पसरवत असल्याचा आरोप झाला. मदुराईच्या एका न्यायालयाने शिल्पा शेट्टी व रीमा सेन यांच्याविरोधात अश्लिलतेस चालना देत असल्याच्या आरोपावरून अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. एका तामिळ मॅगझिनच्या कव्हरपेजवर शिल्पा बोल्ड अवतारात दिसली होती. कोर्टात शिल्पाने आरोप नाकारले होते. हॉलिवूड अभिनेता रिचर्ड गेअरसोबतच्या किसमुळे वादात सापडली होती. २००७ मध्ये दिल्लीतील एका कार्यक्रमात रिचर्डने शिल्पाला स्टेजवर सर्वांसमोर किस केले होते. यावरून चांगले रान माजले होते. या वादावरून शिल्पाला कोर्टात खेचले गेले होते.तसेच शिल्पाचा नवरा राज कुंद्राची आयपीएल टीम राजस्थान रॉयल्सवर फिक्सिंगचा आरोप लागला तेव्हाही शिल्पावर जोरदार टीका झाली होती. २००९ मध्ये बिझनेसमॅन राज कुंद्राबरोबर शिल्पाने लग्न केले होते. दोघांची भेट लंडनमध्येच झाली होती. लंडनमध्ये शिल्पा रियालिटी शो बिग ब्रदर जिंकल्यानंतर प्रसिद्ध झाली होती. तर राजही बिझनेस जगतात नाव कमावत होते. शिल्पाचा परफ्यूम ब्रँड एस-२ च्या प्रमोशनदरम्यान त्यांची भेट झाली होती. राजने शिल्पाचा परफ्यूम ब्रँड प्रमोट करण्यासाठी मदत केली होती. तिची छोटी बहिण शमिता सुद्धा एक बॉलीवूड अभिनेत्री आहे. शिल्पासोबत तिने २००५ मधील “फरेब”मध्ये सोबत काम केले होते. ९० चे दशक आणि २००० नंतरचे फोटो पाहिले तर शिल्पाच्या चेहऱ्यात आमुलाग्र बदल झाल्याचे पाहायला मिळते. चित्रपटात यश मिळवण्यासाठी शिल्पाने प्लास्टीक सर्जरी केली होती. एकदगा नव्हे तर दोन वेळा तिने प्लास्टीक सर्जरी केली होती. शिल्पाने मात्र ते कधीही मान्य केले नाही.
संजीव वेलणकर, पुणे