गायक मिलिंद शिंदे यांचा आज वाढदिवस

जन्म.१२ जून १९६२

मिलिंद शिंदे हे मराठी गायक आहेत. आनंद शिंदे व मिलिंद शिंदे हे दोघे सख्खे भाऊ . मिलिंद शिंदे यांनी अनेक भीमगीते, भक्तीगीते व इतर गीते गायली आहेत.

लग्नाची वरात असो वा जयंती, आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांचे एकही गाणे वाजणार नाही असे होऊच शकत नाही. वडिल प्रल्हाद शिंदे यांच्याकडून मिळालेला लोकसंगीताचा वारसा पुढे चालवणारे मिलिंद शिंदे त्यांच्या दमदार गायकी, ठसकेदार आवाजाने एक वेगळा असा चाहतावर्ग निर्माण झाला. ८० च्या दशकात धुमाकूळ घालणारे गाणे ‘जवा नवीन पोपट’ हा ऐकले की सर्वप्रथम डोळ्यापुढे चेहरा येतो आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांचा. मिलिंद शिंदे मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याचे. पण त्यांचे लहानपण मुंबईत गेले. त्यांचे शालेय शिक्षण ज्ञानमंदिर हायस्कूल, कल्याण व छबीलदास हायस्कूल मुंबई झाले. कव्वालीचे मुकाबले हे त्यांच्या खास आवडीचे. वडिल प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत त्यांच्या कार्यक्रमाला आनंद जात असत. कोरसमध्ये गाणी गाणे त्यांच्या अगदी आवडीचे होते.
आनंद शिंदे यांना जनमाणसात लोकप्रिय करणारे गाणे ठरले जवा नवीन पोपट. या गाणे कसे बनले याची कथाही रंजक आहे. मुरबाड येथे एक कव्वालीचा कार्यक्रम होता. त्यात मानवील गायकवाड हे शिंदे यांच्या पार्टीचे कवी होते. या कार्यक्रमादरम्यान समोरच्या पार्टीने पोपटाचे एक गाणे म्हटले आणि त्याला पोपटाच्या गाण्यानेच उत्तर द्यायचे होते. तेव्हा प्रल्हाद शिंदे यांच्या गाण्यावर गायकवाड यांनी पोपटाचे गाणे रचले आणि नवीन पोपटाते गाणे तयार झाले. हे गाणे नंतर इतके प्रसिद्ध झाले की त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. या गाण्याने त्यावेळी कॅसेटविक्रीचे सर्वच उच्चांक मोडले. हे पाहून व्हिनस कंपनीने त्यांना सुझुकीची एक गाडी भेट दिली. ती आजही त्यांनी प्रेमाने जपून ठेवली आहे.

आनंद शिंदे यांच्या तीन मुलांपैकी आदर्श शिंदे सध्या तरुणाईला आपल्या तालावर डोलायला लावत आहे. एकापेक्षा एक सुपरहिट गाणे सध्या आदर्शच्या नावावर आहेत. समाजाचे ऋण परतफेड करण्यासाठई त्यांनी उत्कर्ष या मुलाला डॉक्टर बनविले. पण तिघाही मुलांना गायनाची आवड आहे. वडिल प्रल्हाद शिंदे यांच्या नावावर त्यांनी स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट ची स्थापना केली आणि या माध्यमातून ते गरीब रुग्णांची मोफत सेवा करत आहेत.

संजीव वेलणकर, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.