महाराष्ट्राचा शालेय शिक्षण विभाग आणि बालभरती शाळकरी विद्यार्थ्यांच्या पाठीवरील पुस्तकांचा भार कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे. बालभारती एक पुस्तकी योजना राबवणार आहे. पहिलीच्या चार विषयांसाठी एकच पाठ्यपुस्तक तयार करण्यात येणार आहे. या एका पुस्तकात मराठी, इंग्रजी, गणित आणि खेळू आणि शिकू या विषयांचा एकत्रित समावेश असेल.
शालेय शिक्षण विभाग बालभारतीच्या सहकार्यानं एक पुस्तक योजना येत्या वर्षापासून राबवण्यात येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पहिलीच्या वर्गासाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. मात्र, येत्या काळात सर्व इयत्तांसाठी ही योजना राबवण्यात येणार आहे. राज्यातील 488 शाळांमध्ये एक पुस्तक योजना राबवण्यात येत असून त्याला विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती बालभारतीचे विवेक गोसावी यांनी सांगितलं आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग आणि बालभारतीच्या वतीनं हा एक पुस्तक योजना उपक्रम नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुसार घेण्यात आला आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पाठ्यपुस्तकं मोफत मिळणार आहे.
घरापासून लांब शाळा असणाऱ्या विद्यार्थ्यांना फायदा
शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयाचा फायदा घरापासून शाळा लांब असणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
एक पुस्तक योजनेअंतर्गत तयार करण्यात येणाऱ्या पुस्तकामध्ये पहिली घटक चाचणी, प्रथम सत्र परीक्षा, दुसरी घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा अशा चार विभागांमध्ये पाठ्यपुस्तकांची रचना असेल. चारही परीक्षांसाठी स्वतंत्र पाठ्यपुस्तक असणार आहे. विद्यार्थ्यांना सत्रानुसार परीक्षा आणावी लागणार आहेत.