आमच्या सर्व वाचकांना दीपावलीच्या लक्ष लक्ष शुभकामना…!
ऋषी सुनक ब्रिटनचे नवे पंतप्रधान…!
ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी माघार घेतल्यामुळे भारतीय वंशाचे ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक ब्रिटन पंतप्रधानपदी निवड झाली आहे. सुनक यांच्या प्रतिस्पर्धी पेनी मॉर्डन्ट यांना २९ खासदारांनी पाठिंबा दिला आहे. त्या आपल्या समर्थकांचा आकडा १०० पर्यंत नेऊ न शकल्याने ऋषी सुनक आपोआपच पंतप्रधानपदी विराजमान झालेत. सुनक यांना सध्या १९२ खासदारांचे समर्थन प्राप्त झाले आहे. सुनक हे २८ आॕक्टोबरला पंतप्रधानपदाची शपथ घेतील.
युद्ध आमच्यासाठी शेवटचा पर्याय, आम्ही शांततेचे पुरस्कर्ते- पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कागरील येथे जाऊन देशाच्या सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली. येथे त्यांनी सैनिकांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाची अर्थव्यवस्था, विकास, सीमा सुरक्षा, भारताचे सामर्थ्य अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले. दरम्यान, युद्ध आणि लष्करी सामर्थ्याबद्दल बोलताना आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत. आम्ही युद्ध टाळण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. मात्र शांती ही सामर्थ्याशिवाय शक्य होत नाही. कोणी वाकडी नजर करून पाहण्याचा प्रयत्न केला, तर भारतीय सैन्य त्यांना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
शिंदे-फडणवीस सरकारचा तो निर्णय, अजितदादांकडून कौतुक पण शरद पवारांची टीका
भूविकास बँकेच्या संपूर्ण कर्जमाफीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे, पण काहीच दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मात्र राज्य सरकारच्या या निर्णयाचं स्वागत केलं होतं. मुख्य म्हणजे अजित पवार अर्थमंत्री असताना 2022-23 च्या अर्थसंकल्पात भूविकास बँकेच्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
दिवाळीत कोलेस्टेरॉल वाढीचं टेन्शन सोडा; हा चिमूटभर मसालाच करेल चमत्कार
सध्या सगळीकडे दिवाळीची धूम पाहायला मिळत आहे. सणांच्या दिवशी लोक मिठाई आणि स्वादिष्ट पदार्थ खाऊन आनंद साजरा करतात. सणासुदीच्या काळात खाण्या-पिण्यासोबतच आरोग्याची काळजी घेणेही खूप गरजेचे असते. मिठाई आणि पदार्थ खाल्ल्याने अनेकांची कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. जर कोलेस्टेरॉलची पातळी मर्यादेपलीकडे वाढली, तर तुम्ही हृदयविकाराच्या झटक्यासारख्या गंभीर समस्यांना बळी पडू शकता.डॉ. अभिनव राज सांगतात की, तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या मसाल्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून लवकर आराम मिळतो. आयुर्वेदिक गुणधर्माने समृद्ध असलेल्या दालचिनीबद्दल त्यांनी माहिती दिली. दालचिनी हा एक असा मसाला आहे, ज्याला बारीक करून पावडर बनवून उच्च कोलेस्ट्रॉलच्या रुग्णांना खाऊ घालावे, तर कोलेस्टेरॉलची पातळी सहज नियंत्रित होईल. दालचिनीचे सेवन चिमूटभरच करावे. हा एक मसाला आहे आणि त्याचे जास्त सेवन केल्यास फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते. तुम्ही एक चतुर्थांश चमचे दालचिनीचे सेवन करू नये. उच्च कोलेस्ट्रॉलसाठी दालचिनी हा रामबाण उपाय मानला जाऊ शकतो.
शिंदे सरकारला घरचा आहेर, आमदार गायकवाडांनी केलं आंदोलन, शेतकऱ्यांसोबत खाल्ली चटणी भाकर !
राज्यात अस्मानी संकट आल्यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अशातच बाळासाहेबांची शिवसेना गटाचे समर्थक आमदार संजय गायकवाड हे आंदोलनाला बसले आहे. संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांसोबत चटणी भाकरी खाऊन एका प्रकारे निषेध केला आहे.बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड हे नेहमी कुठल्या न कुठल्या कारणाने चर्चेत राहतात. आजही त्यांनी चर्चा होईल असंच काही केलं आहे.शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जात आहे, शेतकरी अतिवृष्टीमुळे हताश झाला आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला त्याच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आमदार संजय गायकवाड यांनी चटणी भाकर खाऊन एक अनोखे आंदोलन केलं.
चक्क सोन्याची आहे ‘गोल्डन रॉयल प्लाझा’ मिठाई
दिवाळी हा आनंदाचा सण आहे. हा आनंद द्विगुणित करण्यासाठी जवळच्या माणसांना मिठाई देण्याची परंपरा आहे. तसेच पूजेसाठी देखील प्रसाद म्हणून हमखास मिठाई लागतेच. यात सोन्याची मिठाई असेल तर बातच न्यारी. अशी मिठाई फक्त मोठ्या शहरांमध्ये यापूर्वी उपलब्ध होती. मात्र, यंदा दिवाळीच्या पर्वावर सोन्याच्या वर्खाने मढवलेली मिठाई ‘अन्नपूर्णा फुड्स’ने अहमदनगरमध्ये उपलब्ध करून दिली आहे. 24 कॅरेट सोन्याचा वर्ख असलेली ही ‘गोल्डन रॉयल प्लाझा’ मिठाई 4 हजार रुपये किलोने विक्री होत आहे. सध्या ही मिठाई आकर्षणाचा विषय ठरत आहे.
मिठाई घेण्यासाठी, पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होत आहे. स्वस्त आणि चवीला मस्त असणाऱ्या ‘गोल्डन रॉयल प्लाझा’ मिठाईचा लहान एक बॉक्स 1200 रुपयांना विक्रीसाठी आहे. दिवाळीनिमित्त भेट म्हणून देण्यासाठी सोन्याच्या मिठाईला प्राधान्य दिले जाते. या मिठाईला महाराष्ट्रात विशेष पसंती मिळते.
जय लक्ष्मी माता… दिवाळीच्या मुहुर्तावर अमृता फडणवीस देवीच्या भक्तीत तल्लीन, गायली आरती
आपल्या युनिक आवाजामुळे आणि या ना त्या मुद्यावरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आता दिवाळीच्या मुहुर्तावर नवीन गाणे रिलीज केले आहे. यावेळी त्यांनी दिवाळीच्या मुहुर्तावर लक्ष्मीपूजन आरती गायली आहे.
दिवाळीसह लक्ष्मी मातेशी संबंधित प्रत्येक प्रसंगी ओम जय लक्ष्मी माता आरतीचे पठण केले जाते. या आध्यात्मिक मंत्राच्या समर्पित जपाने घरात समृद्धी आणि बुद्धी येते असेही मानले जाते. याच निमित्ताने अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजात ही आरती गायली आहे.
सितरंग चक्रीवादळाचा धोका; भारतात ‘या’ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला थायलंडने सितरंग असं नाव दिलं आहे. सोमवारी पहाटे 3 वाजून 17 मिनिटांनी हे वादळ सागर बेटाच्या दक्षिणेस सुमारे 520 किमी अंतरावर आणि बांगलादेशातील बारिसालपासून 670 किमी नैऋत्येस होतं. पुढील 12 तासांत ते उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची आणि तीव्र चक्रीवादळात बदलण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सोमवार आणि मंगळवारी देशाच्या काही किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर भारतीय किनारपट्ट्यांच्या भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या चक्रीवादळाचा महाराष्ट्रात परिणाम दिसणार नाही. या चक्रीवादळाचा प्रभाव प्रामुख्याने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टी भागात पाहायला मिळू शकतो. चक्रीवादळामुळे भारतीय किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
‘फिलिप्स’कडून जगभरातील चार हजार कर्मचारी कपात करण्याचा निर्णय
तंत्रज्ञान कंपनी फिलिप्सने एक निवदेन जारी करत लवकरच चार हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार असल्याची घोषणा केली आहे. मागील काही महिन्यांपासून कंपनीला मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागत असल्याने उत्पादन घटले आहे. तसेच कंपनीच्या उत्पन्नावरही मोठा प्रभाव पडला आहे. त्यामुळे हा कठीण निर्णय घेत असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
ऐन दिवाळीतील सूर्यग्रहणात 5 राशींचं फळफळणार नशीब
सूर्यग्रहण ही एक भौगोलिक घटना आहे, ज्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक दोन्ही महत्त्व आहे. जेव्हाही सूर्यग्रहण किंवा चंद्रग्रहण होते तेव्हा त्याचा प्रभाव राशींवर शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारे दिसून येतो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 ऑक्टोबर 2022 रोजी वर्षातील दुसरे सूर्यग्रहण होणार आहे. तज्ज्ञांच्या मते हे आंशिक सूर्यग्रहण असेल.
या ग्रहणाचा शुभ प्रभाव मेष , सिंह , कन्या , तूळ आणि वृश्चिक या 5 राशींवर दिसेल. देवी लक्ष्मीची या लोकांवर विशेष कृपा असेल. या राशीच्या लोकांचा भाग्योदय होईल. त्यांना आर्थिक कौटुंबिक आणि भावनिक पातळीवर खूप फायदा होणार आहे. भोपाळ येथील ज्योतिषी आणि पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊया की, कोणकोणत्या राशींवर या सूर्यग्रहणाचा चांगला आणि फायदेशीर प्रभाव पडणार आहे.
SD Social Media
9850 60 3590