सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) आज(शुक्रवार) सकाळी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरमधील निवासस्थानी छापा टाकला. तसेच, ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानासह त्यांच्या निकटवर्तीयांकडे देखील छापे टाकल्याचे समोर आले आहे. महिनाभरात दुसऱ्यांदा ईडीकडून कारवाई झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत आहे. या कारवाईवर प्रतिक्रिया व्यक्त करत, भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एक मोठं विधान केलं आहे. काही दिवसांनी अनिल देशमुखांची रवानगी तुरूंगात होणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुखचा घरी आज ED ईडीचे छापे, काही दिवसांनी जेलमधे रवानगी होणार. घोटाळ्याचा पैसा कोलकाता कंपन्या द्वारा स्वतःचा कंपन्या मधे वळविला. छगन भुजबळ अशाच प्रकारचा घोटाळ्या मुळे ३ वर्ष जेल मधे होते. काही दिवसांनी अनिल परबची अशीच अवस्था होणार. असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे.
तसेच, ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वसूली मिनिस्टर अनिल देशमुखांच्या घरी छापा मारला. मला खात्री आहे काही दिवसांनी ते तुरूंगात असतील. दुसरे वसुली मिनिस्ट अनिल परब यांचे देखील अनिल देशमुखांप्रमाणेच होईल. असंही किरीट सोमय्यांनी ट्विट केलं आहे.