25 जून 1983 ला बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करत विश्व चषकावर भारताने नाव कोरलं

भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेलेला दिवस म्हणजे 25 जून 1983. याच दिवशी क्रिकेट जगतात काहीसा नवखा असणाऱ्या भारतीय संघाने सर्वांत बलाढ्य वेस्ट इंडिजला पराभूत करत विश्व चषकावर आपलं नाव कोरलं होत.

सध्या जागतिक क्रिकेटमधील सर्वांत बलाढ्य संघामध्ये भारतीय संघाच नाव कायम असतं. कोणताही क्रिकेट प्रकार असलातरी भारत त्यात अव्वल असतो. पण इथवर पोहोचण्याचा भारतीय संघाचा प्रवास तितका सोपा नव्हता. पण जगात बेस्ट होण्याची सुरुवात भारताने आजच्याच दिवशी बऱ्याच वर्षांआधी म्हणजे 25 जून 1983 केली होती. त्याकाळी सर्वांत ताकदवर असणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला नमवत भारताने विश्वचषक जिंकला होता.

विश्वचषकाचा अंतिम सामन्यापर्यंत भारत पोहोचेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. पण कपिल देव (Kapil Dev) यांच्या कप्तानीखाली भारतीय संघानं हे करुन दाखवलं. पण अंतिम सामन्यात टक्कर होती दोनदा विश्वचषक जिंकलेल्या वेस्ट इंडिज संघाशी. वेस्ट इंडिज संघाने भारतीय फलंदाजावर भेदक गोलंदाजी करत त्यांना अवघ्या 183 धावांत ऑलआऊट केले.

भारताकडून सर्वांत कमी वयाचा खेळाडू असणाऱ्या कृष्णमाचारी श्रीकांत यांनी सर्वाधिक 38 धावा केल्या. तर अष्टपैलू मोहिंदर अमरनाथ यांनी 26 धावांच योगदान दिलं होतं.
भारताने ठेवलेलं 183 धावांच लक्ष्य वेस्ट इंडिजसारख्या बलाढ्य संघासाठी अत्यंत कमी होते. मात्र भारताने अप्रतिम गोलंदाजी करत वेस्ट इंडिजला अवघ्या 140 धावांत गुंडाळले. त्यात भारताकडून मदन लाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतले.
भारतीय गोलंदाजानी 140 धावांत वेस्ट इंडिजला ऑलआऊट केले खरे पण सामना बदलला तो एका कॅचने. वेस्ट इंडिजने 183 धावांच्या छोट्या लक्षाचा सामना करत असताना सर गॉर्डन ग्रीनिज, डेसमंड हेंस यांचे विकेटगमावले होते. पण जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक असणारे सर विवियन रिचर्ड्स (Sir vivian Richards) अजूनही क्रिझवर होते. तुफान फटकेबाजी करत असतानाच त्यांनी एक अप्रतिम शॉट हवेत मारला आणि त्याचवेळी क्षेत्ररक्षण करणारे कर्णधार कपिल देव यांनी बऱ्याच दूरचं अंतर गाठत हा अप्रतिम झेल पकडला आणि तिथूनच सामना भारताच्या पारड्यात झुकण्यास सुरुवात झाली.

त्यानंतर भारताने एक एक करत विकेट घेण्यास सुरुवात केली. अखेर वेस्ट इंडिजकडून जॅफ डजन आणि मॅल्कम मार्शल यांनी थोडी झुंज देण्याचा प्रयत्न केला खरा पण भारतीय गोलंदाजानी त्यांचीही विकेट घेत भारताला सामना जिंकवून दिला.
अशारितीने भारताने आपला पहिला विश्वचषक क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्डसवर मिळवला. ज्यानंतर तेव्हापासून आतापर्यंत लॉर्डच्या बाल्कनीतील कपिल देव यांनी चषक घेतलेला फोटो अनेक भारतीय क्रिकेटपटूंना प्रेरणा देत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.