आज दि.१४ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

नव्या शैक्षणिक धोरणात गांधींच्या
आदर्शांचा समावेश : अमित शाह

अमित शाह यांनी महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाबाबत भाष्य केले. “जर भारत सुरुवातीपासूनच गांधींनी दाखविलेल्या मार्गावर चालला असता, तर देशाला सध्या ज्या समस्या आहेत त्यांना तोंड द्यावे लागले नसते. समस्या ही आहे की आपण गांधींनी दाखवलेल्या मार्गापासून भरकटलो होतो. पंतप्रधान मोदींनी नव्या शैक्षणिक धोरणात गांधींच्या आदर्शांचा समावेश केला आहे. उदाहरणार्थ, मातृभाषा आणि राष्ट्रभाषांसोबत रोजगार शिक्षणाला महत्त्व देणे. पंतप्रधानांनी नवीन शैक्षणिक धोरणात सर्व गांधीवादी तत्त्वे अंतर्भूत केली आहेत,” असे अमित शाह म्हणाले.

देशभरात १२ ते १४ वयोगटातील
मुलांसाठी लसीकरण सुरू

करोना विरोधातील लढाईत केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता देशभरात १२ ते १४ वयोगटातील मुलांसाठी लसीकरण सुरू केले जाणार आहे. या मुलांना करोना लस देण्याचा मार्ग मोकळा झाला असून, येत्या बुधवारपासून म्हणजेच १६ मार्चपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांनाही करोनावरील लस दिली जाणार आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी माहिती दिली आहे.

काँग्रेसच्या पराभवासाठी गांधी
कुटुंबीय जबाबदार नाही : खरगे

काँग्रेसच्या पराभवानंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे गांधी कुटुंबाच्या मदतीला धावून आले आहेत. या पराभवासाठी त्या एकट्या नाहीत. राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत, असे खरगे यांनी म्हटले आहे. आम्ही सर्वांनी सोनिया गांधींना सांगितले की पाच राज्यांतील पराभवाला त्या एकट्या जबाबदार नाहीत. यासाठी गांधी कुटुंब नाही तर राज्यातील प्रत्येक नेता आणि खासदार जबाबदार आहेत. आम्ही त्यांच्यावर पुन्हा विश्वास ठेवला आहे, राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे

पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच
असणार : नाना पटोले

सध्या महाराष्ट्रातील राजकारण चांगलच तापलं आहे. भाजपाकडून महाविकास आघाडी सरकार लवकरच पडणार असल्याचं बोललं जात आहे, शिवाय महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले जात आहेत. असं असताना आता नाना पटोले यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेस मिळवणार आणि पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचाच असणार असं म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

दानवे यांच्या कुटुंबातील सदस्यांचे
केशवपन करणार नाही : प्रताप गुरव

केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे हे त्यांच्या भाषण शैलीसाठी विशेष ओळखले जातात. परंतु, याचमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. आता त्यांच्या विरोधात नाभिक समाज आक्रमक झाला आहे. मागील आठवड्यात दानवे यांनी नाभिक समाजाची खिल्ली उडवत अपशब्द वापरले होते. त्यामुळे त्यांना नाभिक समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. रावसाहेब दानवे यांनी लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे केशवपन केले जाणार नसल्याचा इशारा पिंपरी-चिंचवडमधील बारा बलुतेदार महासंघ उपाअध्यक्ष प्रताप गुरव यांनी दिला.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर
लढतच राहणार : फडणवीस

प्रश्न कुठे आणि कोणी बदलले हे मला माहिती आहे. पण त्याने काही फरक पडत नाही. कोणताही गुन्हा नसताना माझ्या वडिलांना इंदिरा गांधींनी दोन वर्षे तुरुंगात ठेवले होते. त्यामुळे तुरुगांत जाण्यासाठी घाबरणारे आम्ही नाहीत. ज्यांनी प्रश्नावली बदलली त्यांनी लक्षात घ्यावे की आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर लढतच राहणार आहोत. यासंदर्भात कायदेशीर लढाई असेल ती लढू,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विद्यार्थ्यांचे वर्ग घेतायेत भाडोत्री शिक्षक,
मालेगावातील धक्कादायक प्रकार

लाखभर पगार असतांना केवळ 1500 रुपये देऊन भाडोत्री शिक्षकाची नेमणूक करायची, आणि स्वत: घरात बसून पूर्ण पगार घ्यायचा असा प्रकार मालेगाव महापालिका शिक्षण मंडळाच्या एका उर्दू शाळेत सुरु आहे. या शाळेत तपासणी करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. या शाळेत महिन्याकाठी पंधराशे रुपयांवर दोन भाडोत्री शिक्षकांची नेमणूक करण्यात आली होती. हे दोन शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत असताना आढळून आले. ज्या शिक्षकांनी अशा प्रकारचे कारनामे केले आहेत,

उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिका
सुमन रणदिवे यांचं निधन

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिक्षिका सुमन रणदिवे यांचं निधन झालंय. ९२ वर्षीय सुमन रणदिवे यांनी रविवारी अखेरचा श्वास घेतला. सुमन रणदिवे या वसईच्या सत्पाळा गावातील ‘न्यू लाईफ फाऊंडेशन’ या वृद्धाश्रमात राहत होत्या. दादरच्या बालमोहन विद्यालयात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यासह दिग्गजांना शिकवलं. त्यांच्यावर विरारमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

क्रिकेटपटू स्टीव्ह वॉने मित्राच्या
अस्थी गंगेत केल्या विसर्जित

ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू स्टीव्ह वॉ यालाही हिंदू धर्माबद्दल आपुलकी राहिली आहे. क्रिकेटमधून १३ वर्षांपूर्वी निवृत्ती घेतली असली तरी स्टीव्ह वॉ सतत भारतात ये-जा करत असतो. २००९ मध्ये स्थापन केलेल्या स्टीव्ह वॉ फाउंडेशनच्या माध्यमातून विविध धार्मिक कार्यक्रमात सहभाग असतो. मात्र यावेळी स्टीव्ह वॉ यांची भारत भेट वेगळ्या कारणासाठी होती. आपल्या जवळच्या मित्राची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी वाराणसी गाठलं. मृत्यूनंतर त्याच्या अस्थिंचं विसर्जन गंगा नदीत केलं.

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.