भरसभेत बोलत असताना अमोल मिटकरींना अर्धांगवायूचा झटका, प्रकृती स्थिर
शिवव्याख्याते आणि राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे सदस्य अमोल मिटकरी यांना अकोला जिल्ह्यातील हिंगणा इथं भर सभेत बोलत असताना अचानक अर्धांगवायूचा सौम्य झटका आला. त्यांना तातडीने खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
रोईंगपटू दत्तू भोकनळवर नांगरणी करण्याची वेळ, सैन्यदलाला ठोकला रामराम
रोईंग स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय रोईंगपटू दत्तू भोकनळवर आता शेतात नांगरणी करण्याची वेळ आली आहे. ऑलिम्पिकसाठी तयारी करत असताना अचानक दत्तू भोकनळला सरावातून डावलण्यात आल्यामुळे त्याने सैन्य दलाचा राजीनामा दिला आहे. दत्तूसोबत नेमकं काय घडलं? या प्रश्नामुळे क्रीडा क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
गड पुन्हा ताब्यात मिळवण्यासाठी राज ठाकरे यांची नव्याने मोर्चेबांधणी!
महाविकास आघाडी सरकारचे तिन्ही पक्ष स्वबळाचा नारा देत पक्ष बळकट करण्यासाठी कार्यक्रम हाती घेतले आहे. तर दुसरीकडे मनसेनंही आपला बालेकिल्ला पुन्हा काबीज करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागले आहे.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी तयार झाले आहे. पुढील आठवड्यात 16 जुलैपासून राज ठाकरे नाशिकच्या दौऱ्यावर जाणार आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
योगी सरकारच्या लोकसंख्या नियंत्रण धोरणाला परिषदेचा विरोध, ‘ही’ तरतूद काढून टाकण्याची मागणी
उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारच्या प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण विधेयकावरुन राजकारण सुरू झालं आहे. समाजवादी पक्षाने यापूर्वीच या विधेयकाला विरोध केलाय. त्या पाठोपाठ आता संघ परिवारातील प्रमुख संस्था असलेल्या विश्व हिंदू परिषदेनं प्रस्तावित कायद्यातील दुसऱ्या भागावर आक्षेप नोंदवला आहे.
वीज कोसळून 11 जणांचा मृत्यू
नैसर्गिक संकट जेव्हा कोसळतं, तेव्हा काही क्षणात होत्याचं नव्हतं झाल्याच्या अनेक घटना आपण पाहतो. पहिल्या पावसात वीज कोसळून 11 जणांचा जागीच मृत्यू झाल्याच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला आहे. ही दुर्दैवी आणि काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली जयपूरमध्ये.
मान्सूनच्या पहिल्याच पावसाचा आनंद लुटण्यासाठी अनेक नागरिक आमेर किल्ल्यावर गेले होते. या किल्ल्यासमोर असणाऱ्या 500 मीटर उंचीच्या टॉवरवर अचानक वीज कोसळली आणि क्षणार्धात अनेकांना आपल्या जिवाला मुकावं लागलं. या घटनेत 11 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 10 जण सध्या मृत्युशी झुंज देत आहेत.
..अखेर नितीन गडकरींनीही केलं मान्य; पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढीबद्दल मोठं विधान
पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. परिणामी विरोधी पक्षाकडूनही सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत नितीन गडकरी यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. अद्याप सरकारमधील कोणत्याच मंत्र्याने पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतीवर खुलेपणाने बोलणं टाळलं आहे. त्यामुळे गडकरींनी केलेलं विधान महत्त्वपूर्ण ठरत आहे.
गडकरी म्हणाले की, इंधनाच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिकांमध्ये संताप, राग आहे. याचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांनी पर्यायी इंधनाच्या प्रयोगांवर जोर देण्याची गरज व्यक्त आहे. नितीन गडकरी यांनी सीएनजी, एलएनजी आणि इथेनॉलच्या प्रयोगांवर अधिक लक्ष केंद्रीय करण्याची गरज व्यक्त केली. केंद्रीय रस्ते, परिवहन मंत्री गडकरी यांनी रविवारी नागपूरमध्ये देशातील पहिल्या लिक्विफाइड नैसर्गिक गॅस फिलिंग सेंटरचं उद्घाटन केलं आहे.
अफगाण सैन्याचं तालिबानच्या हल्ल्याला सडेतोड उत्तर !
अफगाणिस्तानच्या उत्तरेकडील ताखार प्रांताची राजधानी असलेल्या तालुकान शहरावर तालिबानने केलेला हल्ला अफगाणि लष्कराने हाणून पडला आहे. प्रांतीय सरकारचे प्रवक्ते हमीद मुबारिझ या कारवाई नंतर म्हणाले की सैन्याने केलेल्या जबाबाच्या कारवाईत जखमी झालेल्या तब्बल दोन डझनहून अधिक मृतदेहांना सोडून तालिबानी दहशतवाद्यांनी तेथून पळ काढला आहे .
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे तालिबानी दहशतवाद्यांनी एकाच वेळी तालुकान शहरावर हल्ला केला होता परंतु सुरक्षा दलाच्या जवाबी कारवाईने दहशतवाद्यांना तेथून पळ काढण्यास भाग पाडले.
स्वतःच्याच दुकानात डल्ला, मग पोलिसांत तक्रार; 17 लाखांच्या चोरीचं सांगली पोलिसांनी फोडलं बिंग
सांगली जिल्ह्यातील शिराळा याठिकाणी एक भलतीचं घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीनं मित्राच्या मदतीनं स्वतःच्या दुकानावर डल्ला मारून पोलिसांत चोरी झाल्याची तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी तक्रारदार व्यक्तीला अटक करून चोरीचा बनाव उघड केला आहे. पोलिसांनी 17 लाख 70 हजारांच्या मुद्देमालासह आरोपी व्यक्तीला गजाआड केलं आहे. याप्रकरणी चौकशी केली असता पोलिसांनी चोरीचा बनाव रचण्यामागच्या नेमक्या कारणाचा खुलासा केला आहे.
SD Social Media
9850 60 3590