व्हॉट्सअॅप, लोकप्रिय आणि सर्वाधिक वापरलं जाणार इंस्टंट मेसेजिंग अॅप. युझर्सला चॅटिंग करताना चांगला अनुभव यावा यासाठी व्हॉट्सअॅप नेहमीच प्रयत्न करत असतं. व्हॉट्सअॅपने आता आयओएस बीटा यूझर्ससाठी नवं फीचर आणलंय. ज्यामुळे युझर्सना यामुळे व्हॉट्सअॅपचा आणखी फायदा होणार आहे. या अपडेटनुसार, युझर्सना नोटिफिकेशनच्या मदतीनेच मेसेज पाहता येणार आहेत. ज्यामुळे ज्याने मेसेज केला आहे, त्याला मेसज सीन केला आहे की नाही, हे समजणार नाही.
WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप हे फिचर आयओएस यूझर्ससाठी 2.21.140.9 रोलआऊट करत आहे. यामुळे यूझर्सना नोटिफिकेशन बॅनरच्या साहाय्याने एकापेक्षा अधिक जणांचे मेसेज पाहता येतील ते ही व्हॉट्सअॅप न उघडता.
यूझर्सला चॅट पाहण्यासाठी नोटिफिकेशन एक्सपेंड करु शकतात. रिपोर्टनुसार, चॅटचं प्रीव्यू स्टेटिक होणार नाही. तसेच या दरम्यान यूझर्सला फोटो, व्हीडिओ आणि GIF ही पाहता येतील.
समोरच्या व्यक्तीने केलेला व्हॉट्सअॅप मेसेज पाहिल्यानंतर आपोआप त्या मेसेज खाली डबल ब्लू टीक येते. ज्यातून तो मेसेज पाहिल्याचं सूचित होतं. पण या फीचरनुसार आता मेसेज सीन केल्यानंतरही समोरच्याला ब्लू टीक दिसणार नाही. विशेष म्हणजे रीड रिसिप्ट ऑन असल्यानंतरही मेसेजला ब्लू टीक दिसणार नाही. जर एखाद्या यूझरने नोटिफिकेशनद्वारे आलेल्या मेसेजला रिप्लाय केला, तर सर्व ग्रे टीक ब्लूमध्ये बदलतील.