भारतात गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. प्रत्येकजण कोरोना कधी संपूर्णपणे नष्ट होणार हा प्रश्न विचारतोय. मात्र यासंदर्भात देशातील टॉप वॅक्सिन एक्सपर्टने दिलेल्या उत्तरामुळे चिंतेत भर पडणार आहे. वॅक्सिन एक्सपर्ट डॉ. गगनदीप कांग म्हणाले की, भारतात कोरोना व्हायरसचा संसर्ग हा ‘एंडेमिसिटी’च्या दिशेने वाटचाल करतोय.
डॉ. कांग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हा व्हायरस देशातील कधीही न संपणारा आजार बनत चालला आहे.
लोकांनी व्हायरस सोबत जगणं शिकलंय
डॉ. कांग यांच्या सांगण्यानुसार, साथीच्या तिसऱ्या लाटेचं रूप धारण करण्यासाठी स्थानिक पातळीवर संक्रमण देशभरात पसरेल, परंतु ते पूर्वीसारखं नसेल. कोणत्याही रोगासाठी एंडेमिक तो टप्पा आहे ज्यामध्ये लोकसंख्या त्या विषाणूसह जगणं शिकतात. हे मोठ्या संख्येने लोकसंख्येला व्यापलेल्या महामारीपेक्षा खूप वेगळं आहे.
एका इंटरव्यू दरम्यान डॉ. कांग म्हणाले, देशात दुसऱ्या लाटेचा फटका सुमारे एक तृतीयांश लोकसंख्येला बसला. “मग आपण तिसऱ्या लाटेत तीच परिस्थिती उद्भवू शकते का जी दुसऱ्या लाटेत पहायला मिळाली? मला वाटतं की त्याची शक्यता कमी आहे.
आम्ही स्थानिक पातळीवर संक्रमणाचा प्रसार पाहणार आहोत जो स्वरूपात असेस आणि देशभरात पसरलेला असेल. ती तिसरी लाट बनू शकते आणि जर आपण सणांबद्दल आपला दृष्टीकोन बदलला नाही तर ते होऊ शकतं. पण त्याची स्केल आपण आधी पाहिल्याप्रमाणे असणार नाही, असंही डॉ. कांग म्हणाले.
वेल्लोरच्या ख्रिश्चन मेडिकल कॉलेजचे प्राध्यापक कांग म्हणाले, “जेव्हा तुमच्याकडे असं काही आहे जे नजीकच्या भविष्यात संपणार नाही, तेव्हा ते एंडेमिक परिस्थितीत जात आहे.” या क्षणी आम्ही SARS-CoV2 विषाणू नष्ट करण्याच्या दिशेने काम करत नाहीये, याचा अर्थ तो एंडेमिक बनला आहे.”