पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची 24 सप्टेंबरला व्हाईट हाऊसमध्ये द्विपक्षीय बैठक होणार आहे. या बैठकीत दोन्ही देशांमधील अंतर्गत संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न असणार आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये या बैठकीबाबत सांगण्यात आलं आहे. बायडन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतरची मोदी यांची ही पहिलीच भेट असणार आहे.
जो बायडन यांच्या बैठकीआधी 23 सप्टेंबरला अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हैरिस मोदींची भेट घेणार आहे. मोदी आणि बायडेन यांच्यात याआधी अनेकदा व्हीडिओ कॉन्फरन्सिद्वारे चर्चा झाली आहे.
मोदी 2019 मध्ये अमेरिकेचा दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत ‘हाउडी- मोदी’ हा कार्यक्रमला उपस्थित राहिले होते.
व्हाईट हाऊसनुसार, शुक्रवारी जो बायडेन हे जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा यांचीही भेट घेणार आहे. साप्ताहिक कार्यक्रमनुसार, बायडेन हे मोदी, सुगा आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसनयांच्या सोबत व्हाईट हाऊसमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. यामध्ये अफगाणिस्तान, कोरोना संकट, हवामान बदल यासारख्या महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा होतील.
तसेच पहिल्यांदाच जो बायडेन क्वॅाड शिखर संमेलनाचं यजमानपद भूषवणार आहेत. मोदी सहा महिन्यानंतर परदेश दौरा करणार आहेत. पण मोदी कोव्हिड काळात दुसऱ्या परदेश दौऱ्याला जाणार आहेत. याआधी मार्चमध्ये मोदींनी बांग्लादेश दौरा केला होता.