बॉलिवूडची बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सनी लिओनीची सोशल मीडियावर जोरदार फॅन फॉलोईंग आहे. तिचे कोणतेही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतातच. चाहत्यांना सनीची प्रत्येक शैली आणि स्टाईल आवडते. अलीकडेच सनी लिओनीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांसोबत एक मजेदार व्हिडिओ शेअर केला आहे, या व्हिडिओद्वारे ती चाहत्यांना एक मजेदार आव्हान देत आहे. या व्हिडिओतील एका गाण्यावर सनी लिओन अभिनय करताना दिसत आहे, तसंच ती प्रेक्षकांना विचारत आहे की, हे कोणतं गाणं आहे?
नुकतंच सनी लिओनीने तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सनी गाण्यावर अभिनय करताना दिसत आहे. सनी तिच्या कारमध्ये बसून गाण्यावर अभिनय करत आहे आणि हे गाणं कोणतं आहे हे चाहत्यांना विचारत आहे. हा व्हिडिओ शेअर करत सनीने ‘तुम्ही या गाण्याचे अंदाज लावू शकता का?’ असं शीर्षक असलेलं कॅप्शन दिलं आहे.
त्याचबरोबर सनी लिओनीच्या या व्हिडिओवर आतापर्यंत 1,875 हजाराहून अधिक व्ह्यूज आले आहेत. तिचे चाहते सनीच्या व्हिडिओवर सतत कमेंट करत असतात. लाईक्सशिवाय सनी लिओनीच्या व्हिडिओवर कमेंन्टचाही वर्षाव झाला आहे. सनी लिओनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच सनी ‘शिरो’ या थ्रीलर चित्रपटात दिसणार आहे.