श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मोठ्या थाटात विसर्जन
मोरया, मोरया… गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… च्या निनादाने गणपती विसर्जनच्या मिरवणुकीनिम्मित लक्ष्मी रस्त्याचा परिसर दुमदुमून गेला होता. अनंत चतुर्दशीला ‘दगडूशेठ’ चे गणपती बाप्पा हजारो मोतिया रंगाच्या व एलईडी दिव्यांनी उजळलेल्या श्री स्वानंदेश रथामध्ये विराजमान होत सांगता मिरवणुकीत सहभागी झाले. वाजत गाजत आलेली ही गणरायाची स्वारी पाहण्यासोबतच श्रीं चे दर्शन घेण्याकरिता हजारो गणेशभक्तांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. आज सकाळी 11 वाजून 15 मिनिटाला दगडूशेठ गणपती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळच्यावतीने ट्रस्टच्या 130 व्या वर्षानिमित्त आयोजित गणेशोत्सवाची सांगता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावरून शनिवारी सकाळी थाटात निघाली होती. सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी अग्रभागी असलेला स्वच्छतेचा संदेश देणारा ‘जय गणेश स्वच्छता अभियान रथ’ बेलबाग चौकात दाखल झाला होता.
आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादी मविआ आणि शिंदे सरकारमध्ये राडा, हायकोर्टात याचिका दाखल
राज्यपाल नियुक्त आमदाराच्या यादीवरून शिंदे सरकार आणि महाविकास आघाडीमध्ये वाद पेटणार आहे. विधान परिषदेच्या 12 राज्यपाल नियुक्त जागेचा यादीचा वाद मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणी याचिका दाखल करण्यात आली असून राज्यपालांचा निर्णय संशयास्पद असल्याचा उल्लेख केला आहे. या प्रकरणावर लवकरच सुनावणी होणार आहे.
गाडी चालवताना Bluetooth Earphone वापरता? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची
कुठलंही वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणं नियमबाह्य आहे. वाहतुकीच्या नियमावलीत याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. परंतु बहुतांश राज्यांतल्या मोटार वाहन कायद्यात ब्लूटूथ हेडफोन्स किंवा इयरफोन्सबद्दल स्पष्ट माहिती दिली गेलेली नाही.
वेगवेगळ्या राज्यात भिन्न नियमावली आहे; मात्र बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांच्या वेबसाइटवर या संदर्भातला नियम स्पष्टपणे दिला गेला आहे. वाहन चालवताना मोबाइल फोन, इयरफोन्स आणि ब्लूटूथ हेडसेट वापरले, तर दंड केला जाईल, असा स्पष्ट उल्लेख त्यांच्या वेबसाइटवर दिलेल्या नियमात केलेला आहे.
क्रिकेटच्या देवाला खेळताना पाहण्याची पुन्हा संधी
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद झालेलं नाव. सचिननं 90 चं दशक आणि त्यानंतरची अनेक वर्ष क्रिकेटचं मैदान गाजवलं. त्यानं विक्रमांचे अनेक इमले उभारले. त्याच्या काही विक्रमांच्या अजून जवळपासही कुणी गेलेलं नाही. 2013 साली सचिननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये खेळताना दिसला नाही. पण दोन वर्षांपूर्वी रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज टी20च्या निमित्तानं क्रिकेट चाहत्यांना आपल्या लाडक्या सचिनला मैदानात पुन्हा एकदा खेळताना पाहता आलं. आणि ती संधी आता पुन्हा एकदा क्रिकेट रसिकांना मिळणार आहे.
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या या सीझनमध्ये सचिन तेंडुलकरची इंडिया लीजंड्स आणि जॉन्टी ऱ्होड्सची दक्षिण आफ्रिका लीजंड्स टीम आमनेसामने येणार आहेत. कानपूरच्या मैदानात स्पर्धेतला हा पहिला सामना आज संध्याकाळी पार पडणार आहे. या निमित्तानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. सचिनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या इंडिया लीजंड्स संघात हरभजन सिंग, युवराज सिंग, इरफान पठाण, मुनाफ पटेल, सुरेश रैना यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवणाऱ्या माजी खेळाडूंचाही समावेश आहे.
सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार
मान्सूनच्या पावसासाठी पोषक हवामान असल्याने राज्याच्या विविध भागात विजा, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. दक्षिण कोकणातील जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा कमी झाला असला तरी राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान 12 सप्टेंबरपासून निर्देशानुसार मुंबई, ठाण्यासह कोकण भागात पावसाची तीव्रता वाढण्याची दाट शक्यता आहे. घाट भागातही मुसळधार पाऊस पडेल असे सांगण्यात आले.
पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर; नितीन वैद्य, शरद बाविस्कर, छाया कदम, अनिल साबळे आणि संतोष आंधळे ठरले मानकरी
साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचा म्हणून ओळखला जाणारा पद्मश्री दया पवार स्मृती पुरस्कार जाहीर झाला असून यंदाच्या पुरस्कारांसाठी निर्माते-दिग्दर्शक नितीन वैद्य, अभिनेत्री छाया कदम, कवी आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल साबळे आणि वैद्यकीय पत्रकार संतोष आंधळे यांची निवड झाली आहे. सोबतच ‘भुरा’ या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी जेएनयूचे प्रा. शरद बाविस्कर यांना यंदाचा ग्रंथाली पुरस्कृत ‘बलुतं’ पुरस्कार जाहीर झाला आहे.
मंगळवार, २० सप्टेंबर २०२२ रोजी सायंकाळी ५ वाजता दादर माटुंगा कल्चरल सेंटर, मुंबई येथे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली दया पवार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात नाही तर थेट दिल्लीत खलबतं, अध्यक्षपदाबाबत मोठा निर्णय होणार
महाराष्ट्रात दोन महिन्यांपूर्वी सत्तांतर झालं. या घडामोडी ताजी असताना महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पक्षांमधील एक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून फार महत्त्वाची माहिती समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात नाही तर थेट देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं उद्या दिल्लीतच राष्ट्रीय अधिवेशन भरवण्यात आलं आहे. त्याआधी आज कार्यकारिणीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे मोठे नेते बैठकीसाठी दिल्लीत दाखल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात पक्षाचा नवा राष्ट्रीय अध्यक्ष ठरविण्यात येणार आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आज कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीत अध्यक्षपदाबाबत ठराव मांडण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कायम राहणार आहेत. त्याबाबतचा ठराव या बैठकीत घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
‘बारामती जिंकणं अवघड नाही, मोदींचा पराभव होणार नाही’, कामगार मंत्र्यांचा दावा
“भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांचा पराभव झाला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीच पराभूत होऊ शकत नाहीत. कारण ते देशातील लोकांचा आत्मा आहेत”, असं भाकीत कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी केलं आहे. कामगार मंत्री सुरेश खाडे आज विठ्ठल रूक्मिणी दर्शनासाठी पंढरपुरात आले होते. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी मोदी कधीच पराभूत होणार नसल्याचं विधान केलं.
‘सरकारच्या फार भरवशावर राहू नका….’, नितीन गडकरींचं रोखठोक विधान
राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा कहर बघायला मिळतोय. अनिश्चित पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होतंय. त्यामुळे अनेकदा शेतकरी केंद्र आणि राज्य सरकारकडून काही दिलासा मिळेल का? अशा आशेने मदतीची वाट पाहत असतो. आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. देशातील जवळपास 60 टक्के नागरीक आजही शेती करतात. त्यामुळे शेती संबंधित उद्योगधंद्यांना चालना मिळावी, तसेच शेतकऱ्याला प्रोत्साहन मिळावे यासाठी सरकारकडून नवनवीन योजना याव्यात अशी सर्वसामान्यांची अपेक्षा असते. अर्थात सरकार त्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न देखील करतंय. या दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या भरवशावर राहू नका, असं विधान केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पैशांची गादी करून झोपायचा व्यावसायिक, EDच्या छाप्यात 7 कोटी जप्त
आयकर आणि ED टीम सध्या देशातील वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकत आहे. ED ने नुकतीच पश्चिम बंगालमध्ये ६ ठिकाणी ही छापेमारी केली. गेल्या काही दिवसांपासून मनी लाँड्रिंग प्रकरणी ED वेगवेगळ्या ठिकाणी धाडसत्र सुरू केलं आहे.
एका व्यवसायिकाच्या घरातून जवळपास ७ कोटी रुपयांची रक्कम ED ने ताब्यात घेतली आहे. कोलकातामध्ये ३ ठिकाणी छापेमारी करण्यात आली. मोबाईल गेमिंग फ्रॉड प्रकरणी ही छापेमारी करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
SD Social Media
9850 60 3590