सध्या बॉक्स ऑफिसचा गल्ला ओसांडून वाहतोय. कारण अनेक ब्लॉकबस्टर सिनेमे सध्या बॉक्स ऑफिस गाजवत आहेत. अश्यात आता कोण जास्त गल्ला जमावणार आणि कोण शंभरी पार करणार याची लढाई सुरू झाली आहे. एकीकडे ‘द काश्मीर फाईल्स‘ (The Kashmir Files) बॉक्सऑफिसवर धुमाकूळ करतोय. या सिनेमाने आतापर्यंत 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 8.50 कोटी, रविवारी 15.10 कोटी, सोमवारी 15.05 कोटी तर मंगळवारी 18 कोटींची कमाई ‘द काश्मीर फाईल्स’ने केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 60 कोटींहून जास्त कमाई केली आहे.
दुसरीकडे सुपरहिट सिनेमांचे बादशाह संजय लीला भन्साळी यांचा गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा प्रेक्षकांची मनं जिंकतोय. आलिया भटच्या कामाचं कौतुक होतंय. या सिनेमाने आतापर्यंत 109.50 कोटी इतकी कमाई केली आहे. त्यामुळे ‘द काश्मीर फाईल्स’गंगुबाई सिनेमाला मागे टाकणार का, अशी चर्चा सध्या होतेय.
द काश्मीर फाईल्स’ बॉक्सऑफिसवर धुमाकूळ करतोय. या सिनेमाने आतापर्यंत 60 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. शुक्रवारी 3.55 कोटी, शनिवारी 8.50 कोटी, रविवारी 15.10 कोटी, सोमवारी 15.05 कोटी तर मंगळवारी 18 कोटींची कमाई ‘द काश्मीर फाईल्स’ने केली आहे. आतापर्यंत या सिनेमाने 60 कोटींहून जास्त कमाई केली आहे. याबाबत सिनेमांच्या ट्रेंडचे अभ्यासक तरण आदर्श यांनी ट्विट केलं आहे.