जवळपास दोन वर्षानंतर शासनाकडून कोव्हिड नियम शिथील केल्यानंतर यंदाची दिवाळी मोठ्या उत्साहात पार पाडली. अशातच दिवीळी सणाचेनिमित्त शिवसेनेच्या प्रवक्त्या व नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी दहिसर रिव्हर फेस्टचे नियोजन बद्ध आयोजन केले. या कार्यक्रमाला गेल्या दोन दिवसात सुमारे 25000 नागरिकांनी रस्त्यावर उतरून दहिसर रिव्हर फेस्टला उस्फूर्त प्रतिसाद दिला. पण, कोव्हिडच्या नियमांचे तीन तेरा वाजल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे या कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.
दहिसर नदीच्या तीरावर शिवकन्या आणि श्रीमंत माउली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दि,4 ते 7 नोंव्हेंबर याकाळात अनोख्या “दहिसर रिव्हर फेस्ट” चे आयोजन करण्यात आले होते. तरुणाई बरोबर जेष्ठ नागरिकांनी दहिसर फेस्टचा मनमुराद आनंद लुटला. नागरीकांना गाण्याच्या ठेक्यावर नृत्य करत दहिसर रिव्हर फेस्टला उस्फूर्त प्रतिसाद दिला. मात्र, यामध्ये कोरोना नियामांचे उल्लंघन केले असल्याचे पाहायला मिळाले.
झालेल्या या कार्यक्रमात कोणाच्याही तोंडावर मास्क दिसला नाही. तर सोशल डिस्टेंस नियमांचेही उल्लघंन करण्यात आले. सत्तेतील पक्षाच्याच कार्यक्रमात झालेले नियमांचे उल्लघन पाहून पोलिस प्रशासन कारवाई करेल का? असा सवाल उपस्थित होत आहेत.