भारतात फार महागाई वाढलेली
नाही : निर्मला सीतारमण
नैसर्गिक वायू आणि खनिज तेलाच्या आंतरराष्ट्रीय किंमती आणि त्यापरिणामी देशांतर्गत उत्पादित किंमतीतील वाढीतून घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई दर मार्चमध्ये १४.५५ टक्के नोंदविला गेला. घाऊक महागाई दर चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. ही वाढ अपेक्षेपेक्षा एक टक्का अधिक असल्याने चिंता व्यक्त केली जात असतानाच दुसरीकडे या वाढत्या महागाईच्या निर्देशांकासंदर्भात बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महागाई निर्देशांकामधील ही वाढ ‘एवढी वाईट नाही’ असं म्हटलंय. निर्मला या सध्या वॉशिंग्टनमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) आणि जागतिक बँकेने आयोजित केलेल्या परिषदेमध्ये सहभागी झाल्या आहेत. तिथेच बोलताना सीतारामन यांनी महागाई एवढी काही वाढलेली नाही असा सूर लावल्याचं दिसून आलं.
देशात दुसऱ्या दिवशी २४ तासात दोन
हजारापेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद
देशात सलग दुसऱ्या दिवशी २४ तासात दोन हजारापेक्षा जास्त करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गुरुवारी देशात २ हजार ३८० नवे रुग्ण आढळले असून १ हजार २३१ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला १३ हजार ४३३ अॕक्टिव्ह रुग्ण आहेत. याआधी बुधवारी देशात २ हजार ६७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मंगळवारी १ हजार २४७ रुग्ण आढळले असताना बुधवारी झालेली ही वाढ मोठी होती.
१८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयातील
उपचाराचा खर्च सरकारी तिजोरीतून
करोना काळात एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी धावाधाव करावी लागलेली असताना धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या दोन वर्षात करोना काळात राज्य सरकारमधील १८ मंत्र्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेत लाखोंचा खर्च केल्याचं वृत्त झी २४ तासने दिलं आहे. उपचाराचा सर्व खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. राज्यात खळबळ उडाली आहे.
धनंजय मुंडे यांना धमकी
देणाऱ्या रेणू शर्माला अटक
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल करण्याची धमकी देऊन, तब्बल पाच कोटी रुपायांची खंडणी मागून ब्लॅकमेल करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेस इंदूर येथून अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीस रेणू शर्माला मुंबईत आणणार आहेत.
सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर
पोलिसांमध्ये तक्रार दिली : मुंडे
मागील दीड-दोन वर्षांपासून मला हा त्रास सुरू आहे. या पूर्वी देखील त्यांनी एक खोटी तक्रार माझ्याविरोधात केली होती, नंतर ती तक्रार परत वापस घेतली. ज्या काही गोष्टी मागील दीड-दोन वर्षांत झाल्या,ज्या काही मी सहन करत होतो. सगळ्या गोष्टी सहनशक्तीच्या पलीकडे गेल्यानंतर शेवटी मला पोलिसांमध्ये ही तक्रार द्यावी लागली. तक्रार देत असताना पोलिसांना माझ्याकडून जे काही पुरावे द्यायचे, त्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत. आता यात जे काय करायचं ते पोलिसांना करायचं आहे.” असं धनंजय मुंडे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यास
लैंगिक खच्चीकरण केले जाणार
महिलांवर बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा देण्यासंदर्भात गेल्या कित्येक वर्षांपासून भारतात चर्चा सुरू आहे. वाढत्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचं असल्याचं वारंवार नमूद करण्यात आलं आहे. यासंदर्भात महाराष्ट्र सरकारने नुकताच शक्ती कायदा देखील पारीत केला आहे. मात्र, आता दक्षिण अमेरिकेतील एका देशानं अल्पवयीन मुलींवर बलात्कार करणाऱ्यांचं केमिक कॅस्ट्रेशन (रसायने टोचून लैंगिक खच्चीकरण) करण्यासंदर्भातलं विधेयक मंजूर करण्यासाठी पावलं उचलायला सुरुवात केली आहे. देशाच्या संसदेमध्ये हे विधेयक मांडण्यात आलं. संसदेची मंजुरी मिळाल्यास त्याचं कायद्यात रुपांतर होणार आहे.
अफगाणिस्तानमध्ये मशिदीत
स्फोट 18 जणांचा मृत्यू
अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीत स्फोट झाल्याची बातमी आहे. यासोबतच काबूल, नांगरहार आणि कुंदुज येथेही स्फोट झाले आहेत. या स्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला. त्याचबरोबर अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अफगाणिस्तानमधील मजार-ए-शरीफ मशिदीसह देशाच्या इतर भागात झालेल्या बॉम्बस्फोटात 18 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अनेक जण जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अफगाणिस्तान 4 स्फोटांनी हादरला आहे.
जागतिक बँक श्रीलंकेला
तातडीची मदत करणार
जागतिक बँक श्रीलंकेला तातडीची मदत करणार आहे. श्रीलंकेतील अभूतपूर्व आर्थिक संकटामुळे या देशाच्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बुधवारी एका बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही श्रीलंकेस सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे वृत्त आहे. जागतिक बँकेचे उपाध्यक्ष हार्टविग श्खाफर यांनी श्रीलंकेच अर्थमंत्री अली साबरी यांच्याशी मंगळवारी वॉिशग्टन येथे चर्चा केल्याचे वृत्त बुधवारी ‘कोलंबो गॅझेट’ने दिले
SD social media
9850 60 3590