आज दि.१७ मार्च च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

होळी आणि धुळवडीवर घातलेले
निर्बंध सरकारने घेतले मागे

करोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे निर्बंध मागे घेतले आहेत. यामुळे यंदा निर्बंधमुक्त होळी, धुळवड साजरी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कोरोना देशात चौथी लाट
येण्याची शक्यता

जगातील काही देशात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय. त्यामुळे चिंतेत भर पडली आहे. दक्षिण पूर्व आशियातील अनेक भागांमध्ये कोरोनामध्ये झपाट्याने वाढ झाली आहेत. कोरोनाचा वाढता धोका आणि देशात चौथी लाट येण्याची शक्यता असताना आरोग्य मंत्रालयाने मोठी बैठक बोलावली आहे. आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या पार पडलेल्या बैठकीत कोरोनासंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

एखाद्या चित्रपटावरून गट तयार
होणं बरोबर नाही : नाना पाटेकर

द कश्मीर फाईल हा चित्रपट मी पाहिलेला नाही. त्यामुळे मला त्याबद्दल सविस्तर बोलता येणार नाही. तो पाहिला असता तर मला सांगता आलं असतं. पण एखाद्या चित्रपटाबद्दल असा वाद होणं बरोबर नाही”, असं नाना पाटेकर म्हणाले आहेत. मला वाटतं की इथले हिंदू आणि इथले मुसलमान हे इथलेच आहेत. त्यांनी एकत्र राहाणं गरजेचं आहे. त्यांनी एकत्रच राहावं. गट होत असतील तर ते चुकीचं आहे”, असं देखील नाना पाटेकर यांनी नमूद केलं.

मुस्लिमांविरुद्ध द्वेष
वाढवला जात आहे : ओवेसी

एनडीटीव्हीशी बोलताना असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, “चित्रपट पाहिल्यानंतर लोक मुस्लिमांविरोधात व्हिडीओ बनवत आहेत. देशात मुस्लिमांविरुद्ध द्वेष का वाढवला जात आहे? सोशल मीडियावर असे किती व्हिडीओ पडले आहेत, ज्यात लोक सिनेमागृहात उभे राहून मुस्लिमांच्या विरोधात भाषण करत आहे, असं का होतंय?,” असे प्रश्न ओवेसी यांनी उपस्थित केले आहेत

चित्रपटात काहीही काल्पनिक
दाखवलेले नाही : चिन्मय मांडलेकर

द कश्मीर फाइल्स हा चित्रपट प्रदर्शित होऊन काही दिवस उलटले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकजण भावूक झाले. तर काहींच्या अंगावर अक्षरश काटा आला, असे मत प्रेक्षक व्यक्त करत आहे. नुकतंच बिट्टाची भूमिका जिवंत करणाऱ्या चिन्मय मांडलेकरने एबीपी माझा या वाहिनीला मुलाखत दिली. या चित्रपटात काहीही खोटं दाखवलेले नाही. यात घडवलेले किंवा काल्पनिक काहीही नाही, असे चिन्मय मांडलेकरने सांगितले.

शारापोव्हा, शूमाकर यांच्या
विरोधात गुन्हा दाखल

माजी रशियन टेनिस चॅम्पियन मारिया शारापोव्हा आणि सात वेळा फॉर्म्युला वन रेसिंग वर्ल्ड चॅम्पियन मायकेल शूमाकर यांच्या नावाने एक एफआयआर नोंदवण्यात आला आहे. या दोघांविरोधात गुडगाव पोलीस ठाण्यात फसवणूक आणि गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार एफआयआर नोंदवली गेली. एफआयआरमध्ये नाव असलेल्या आरोपींमध्ये रिअल इस्टेट प्रकल्पाचे संचालक आणि इतर विकासकांचा समावेश आहे, अशी माहिती दिली.

वर्षभरात सीआरपीएफने १७५
दहशतवाद्यांना घातलं कंठस्थान

केंद्रीय राखीव पोलीस दलाने म्हणजेच सीआरपीएफने जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भातील आकडेवारी समोर आली आहे. १ मार्च २०२१ ते १६ मार्च २०२२ या वर्षभराच्या कालावधीमध्ये सीआरपीएफने जम्मू-काश्मीरमध्ये १७५ दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे तर १८३ जणांना ताब्यात घेतलंय अशी माहिती सीआरपीएफचे निर्देशक कुलदीप सिंह यांनी मंगळवारी दिली. सीआरपीएफने १९ माओवाद्यांना ठार केलंय. कट्टरतावादी संघटनेतील ६९९ जणांना वेगवगेळ्या कारवायांदरम्यान या एका वर्षाच्या काळात अटक केल्याचंही कुलदीप सिंह यांनी म्हटलंय.

यूजीसी चार वर्षांचा नवा पदवी
अभ्यासक्रम सुरु करणार

यूजीसी चार वर्षांचा नवा पदवी अभ्यासक्रम सुरु करणार आहे. पीएचडी अभ्यासक्रमात सुद्धा सुधारणा करणार आहे. 10 मार्च रोजी यूजीसीच्या झालेल्या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या सुधारणांबाबत चर्चा झाली आहे.
यामध्ये चार वर्षांच्या पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थी पीएचडी प्रवेशासाठी पात्र ठरु शकेल, अशा प्रकारच्या सुधारणा करण्याचा विचार यूजीसीने केला आहे. हा नवा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम तयार करताना सुद्धा विद्यार्थ्यांना मल्टी एन्ट्री आणि एक्झिट पॉईंट असतील.

जगभरातील शेअर
बाजारात नोंदवली तेजी

धुलिवंदनाआधीच भारतीय शेअर बाजारात उत्साहाचे रंग उधळल्याचे दिसून येत आहेत. शेअर मार्केटमध्ये सलग काही दिवसांपासून तेजीचा माहोल दिसत आहे. अमेरिकी फेडरल बँकेने व्याजदरात वाढ केल्यानंतर देखील जगभरातील शेअर बाजारात तेजी नोंदवली गेली. धुलिवंदनाआधीच भारतीय शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी तेजी नोंदवली गेली. अमेरिकेच्या फेडरल बँकेने व्याजदर वाढवल्यानंतर जगभरातील इक्विटी बाजारात तेजी दिसून आली. मार्केट उघडताच सेंसेक्स 850 अंकांची नोंदवली गेली.

वंदे भारत रेल्वे प्रतितास
२०० किमीच्या वेगाने धावणार

भारतीय रेल्वे विभाग मेड इन इंडिया या संकल्पनेवर जास्त भर देत असून रेल्वे निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. आता वंदे भारत रेल्वे प्रतितास २०० किमीच्या वेगाने धावणार असून त्यावर काम करण्यात येत आहे. तशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत दिली. आज लोकसभेत रेल्व बजेटवर चर्चा करण्यात आली. यावेळी वैष्णव यांनी रेल्वे विभाग कोणत्या गोष्टींवर काम करत आहे, याची सविस्तर माहिती दिली

SD social media
9850 60 35 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.