अभिनेत्री श्रेया बुगडे ‘चला हवा येऊ द्या’ च्या माध्यमातून घराघरात पोहोचली आहे. ती संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी बनली आहे. तिला पडद्यावर पाहणं चाहत्यांना नेहमीच आवडतं. श्रेया बुगडे सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असते. चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. कधी ट्रीपचे तर कधी कामाच्या अपडेटबद्दल ती माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच एका मुलाखतीत श्रेया बुगडेने तिच्या एका महाभयंकर व्यसनाबद्दल खुलासा केला आहे. तिन हे व्यसन सोडण्यासाठी खूप प्रयत्न केला पण ते काही सुटायचे नाव घेत नसल्याचे देखील तिनं या मुलाखतीत सांगितले.
अभिनेत्री श्रेया बुगडेने नुकतीच राजश्री मराठीच्या एका कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी तिनं तिची खाण्याची आवड तसेच लॉकडाऊनमधीस तिचा स्वयंपाक करण्याचा अनुभव तसेच सेटवरील गंमती या आणि आशा अनेका गोष्टींचा खुलासा केला. यावेळी तिनं तिला जडलेल्या एका महाभयंकर व्यसनाबद्दल सांगितले. शिवाय यामुळे तिनं खूप पैशांचा चूरा केल्याचे देखील सांगितले.
राजश्री मराठीच्या एका कार्यक्रमात श्रेया बुगडे म्हणाली मला इतर मुलींप्रामणे शॉपिंग करायला खूप आवडते. मी शॉपोहोलिक असल्याचे तिनं सांगितलं. यावेळी तिला असं देखील विचारण्यात आलं की, तुझ्याकडे किती साधारण किती बॅग्ज आणि गॉगल्स आहेत. असा प्रश्न विचारण्यामागे देखील कारण आहे. कारण प्रत्येक ड्रेसवर वेगळी बॅग तर घेते शिवाय प्रत्येक ड्रेसवर वेगळ्या ग्लासेस म्हणजे गॉगल घालत असते. श्रेयाचं हे गॉगल आणि बॅग वरील प्रेम आता सर्वांना परिचीत झालं आहे.
अनेकांना प्रश्न पडतो की श्रेया बुगडेकडे किती गॉगल आणि बॅग असतील..श्रेया बुगडे यावेळी म्हणाली गॉगल तर 50 च्या वर असतील .शिवाय बॅग तर इतक्या आहेत की ठेवायचे कुठे असा मला प्रश्न पडतो. असं जरी असले तरी मी जिथं जाईल तिथं नवीन गॉगल दिसला तरी घेतच असते. शिवाय बॅग देखील खरेदी करत असते. मला या गोष्टी खरेदी करायचं इतकं व्यसन जडले आहे की, माझा नवरा देखील आता यावर मला काही बोलत नसल्याचे तिनं सांगितलं. त्यानं आता बोलयचं सोडल्याचे देखील श्रेया यावेळी म्हणाली.
यावेळी श्रेया बुगडेने हे देखील सांगितले की, मला दररोज ड्रेसप करूनच सेटवर जाईला आवडतं. तसेच मी आधल्या दिवशीच ठरवते कोणत्या ड्रेसवर कोणती बॅग व गॉगल घालायचा. आत तसं मला समजायला लागलय.. पण मी दररोज वेगळं ट्राय करतेच असं देखील तिनं सांगितलं. असं हे श्रेयाला व्यसनं जडलं आहे, ती सुटता सुटत नसल्याचे देखील तिनं सांगितलं.