भारत पाकिस्तान सामन्यावर निसर्गाचं संकट; रद्द झाल्यास लाखो कोटींचा फटका

भारत आणि पाकिस्तानचे संघ २३ ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये आमनेसामने येणार आहेत. त्याला ‘महामुकाबला’ असेही म्हटले जात आहे. पण सध्या या महामुकाबल्यावर पावसाचे ढग दाटून आले आहेत. हे दोन संघ नुकतेच आशिया चषकामध्ये आमनेसामने आले होते, त्यानंतर भारताने साखळी फेरी जिंकली, तर पाकिस्तानने सुपर-४ फेरी जिंकली. गेल्या वर्षी टी२० विश्वचषकातच भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला होता. आता टीम इंडिया त्या पराभवाचा बदला घेण्याचा प्रयत्न करेन.

पूर्व आणि दक्षिण-पूर्व ऑस्ट्रेलियामध्ये येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस अपेक्षित आहे आणि या पावसाचे सावट एमसीजीमध्ये होणारी सुपर-१२ मधील सलामीची लढत आणि मेलबर्नमध्ये भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो. हवामान खात्यानुसार, शनिवारी संध्याकाळी सिडनीमध्ये १ ते ३ मिमीसह ८०% पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या शुक्रवारी सर्वात उष्ण दिवस असल्याचेही सांगितले जात आहे. दुपारी आणि संध्याकाळी पावसाचा सर्वाधिक अंदाज आहे. या दिवशी गतविजेता आणि यजमान ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. इतकेच नाही तर मेलबर्नमध्ये दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी, ज्या दिवशी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येतील त्या दिवशी १० ते २५ मिमी दरम्यान पाऊस पडण्याची ९०% शक्यता आहे.

२३ ऑक्टोबरच्या रविवारी चाहत्यांना किमान ५-५ षटकांचा तरी सामना होईल अशी अपेक्षा आहे, परंतु तसे न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. कारण साखळी गटातील सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. १० पेक्षा कमी षटकं झाल्यास आयोजकांनाही मोठा आर्थिक फटका बसणार आहे. आयोजकांना प्रेक्षकांना (US$4,500,000) ३७ कोटी २५ लाख २३,९५० रुपयांचे रिफंड म्हणून परत करावे लागणार आहे. त्यामुळे भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी गेलेल्या क्रिकेटरसिकांनी छत्री, रेनकोट, डकवर्थ लुईस शीट जवळ ठेवावी. याआधीच बुधवारी १९ तारखेला भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज ब्रिस्बेन येथे होणारा दुसरा आणि शेवटचा सराव सामना रद्द करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.