अक्षय तृतीया हा दिवस हिंदू धर्मात खूप महत्वाचा आहे. अक्षय तृतीयेचा सण दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी लोक दान करतात. या दिवशी सोने-चांदी खरेदी केले जाते. मान्यता आहे की, या दिवशी सोन्याची खरेदी केल्यास देवी लक्ष्मी घरात निवास करते आणि घरात समृद्धी येते.
धार्मिक दृष्टीने हा दिवस खूप शुभ मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूचे नर-नारायण, हयाग्रीव आणि परशुरामां हे आवतार झाले होते. म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी नारायण आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. या दिवशी त्रेतायुगला सुरुवात झाली. असे मानले जाते की या दिवशी केलेले शुभ कार्य शुभ परिणाम देते, म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया आणि आखा तीज या नावांनी ओळखला जातो. यावेळी अक्षय तृतीया 14 एप्रिल 2021 रोजी साजरी केला जाईल. त्याचे महत्त्व, सोने आणि इतर वस्तू खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त जाणून घ्या.
शुभ मुहूर्त
तृतीया प्रारंभ : 14 मे 2021 सकाळी 5 वाजून 38 मिनिटांपासून
तृतीया समाप्त : 15 मे 2021 सकाळी 7 वाजून 59 मिनिटांनी
पूजेचा शुभ मुहूर्त : पहाटे 5 वाजून 38 मिनिटांपासून ते दुपारी 12 वाजून 18 मिनिटांपर्यंत
ज्योतिषाचार्य डॉ. अरबिंद मिश्रा यांच्या मते, या तिथीला केलेल्या दान-धर्माचा अक्षय म्हणजेच कधीही नष्ट न होणारे पुण्य प्राप्त होते. तसेच पितरांचे आशीर्वाद प्राप्त होतात. यामुळे, एखाद्या व्यक्तीचे दु:ख दूर होतात. म्हणून या दिवशी दान देण्याचे विशेष महत्त्व मानले जाते. याशिवाय, अक्षय तृतीयेच्या दिवशी गंगा स्नानालाही विशेष महत्त्व आहे, परंतु कोरोना कालावधीत गंगा घाटावर जाऊन स्नान करणे शक्य नाही, अशा परिस्थितीत अंघोळ करताना पाण्यात गंगा जल मिसळा.
अक्षय तृतीयेला वसंत ऋतूचा शेवट आणि ग्रीष्म ऋतूची सुरुवात मानली जाते, म्हणून या दिवशी पाण्याने भरलेले भांडे, पंखे, छत्री, तांदूळ, मीठ, तूप, खरबूज, काकडी, साखर, हिरव्या भाज्या, सरबत आणि सत्तू इत्यादी उष्णतेपासून दिलासा देणाऱ्या गोष्टी दान करणे शुभ मानले जाते. असेही म्हटले जाते की, या दिवशी जे काही दान केले जाईल, त्या सर्व गोष्टी पुढील आयुष्यात प्राप्त होतील. म्हणून बरेच लोक या दिवशी सोने-चांदी देखील दान करतात.
ज्योतिषाचार्य डॉ. अरबिंद मिश्रा यांच्या मते, अक्षय तृतीयेचा दिवस इतका शुभ आहे की या दिवशी कोणतेही शुभ कार्य कोणत्याही पंचांगविना करता येते आणि कोणतीही वस्तू खरेदी केली जाऊ शकते. परंतु तरीही या अक्षय तृतीयेला आपण विशेष मुहूर्तावर सोने खरेदी किंवा इतर कोणतेही शुभ कार्य करु इच्छित असाल, तर मग जाणून घ्या सर्वात शुभ मुहूर्त –
सकाळी 7:30 ते 9:43 वाजेपर्यंत
दुपारी 12:10 ते सायंकाळी 4:39 वाजेपर्यंत
सायंकाळी 6:50 ते रात्री 9:08 वाजेपर्यंत
राहुकाल सकाळी 10:30 वाजेपासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत असेल, यादरम्यान कोणतेही शुभ कार्य आणि खरेदी करणे टाळा.