सोलापूर विद्यापीठाचे बजेट सिनेट सदस्यांनी बहुमताने फेटाळले

महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षेत्रात दुर्मिळ घटना घडलीय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे बजेट सिनेट सदस्यांनी बहुमताने फेटाळले गेलं आहे. बजेटवर अनेक सदस्यांना आक्षेप होता त्यामुळे विद्यापीठच्या अधिसभेच्या सदस्यांनी बजेटविरोधात मतदान केले. बजेटच्या विरोधात 22 सदस्यांनी तर बजेटच्या बाजूने 11 सदस्यांनी मतदान केले तर 3 सदस्य तटस्थ राहिले. मागील अनेक दिवसापासून विविध प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याने सिनेट सदस्यांनी विरोधात मतदान केले.

दरम्यान हे बजेट फेटाळले असले तरी ते विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवलं जाणार असल्याची माहिती मिळतेय. तर, कुलुगरुंनी बजेट मंजूर करुन घेण्यात अपयश आल्यानं राजीनामा द्यावा, अशी मागणी बजेट विरोधात मतदान करणाऱ्या सिनेट सदस्यांनी केली आहे.

काही सदस्यांनी यात राजकारण आणून केवळ विरोधासाठी विरोध म्हणून अंदाजपत्रकाच्या विरोधात मत नोंदविले, असल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार यांनी दिली. दरम्यान हे बजेट फेटाळले असले तरी ते विद्यापीठाचे कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे हे अंदाजपत्रक मंजुरीसाठी पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आज जे बजेट सादर करण्यात आलं ते नामंजूर करण्यात आलं त्यांच्या मागे अनेक गोष्टी होत्या. विद्यापीठाच्या कुलगुरु इतक्या दिवसांपासून कुणाचं ऐकत नव्हत्या, बोलवत नव्हत्या. त्यामुळं त्यांच्यासोबत कसं काम करायचं,अशी आमची भावना होती. बजेटमध्ये देखील काही गोष्टी होत्या. 35 रुपयांचा विषय असेल, गाड्या खरेदीचा विषय असेल तो व्यवस्थापन परिषदेसमोर यायला पाहिजे होत्या. विद्यापीठ फंडाचा खर्च आता संपत आला आहे. राज्यपाल आले होते तेव्हा आम्हाला बोलवण्यात आलं नाही. नॅक कमिटी आली तेव्हा आम्हाला बोलावण्यात आलं नाही.

पदवीदान समारंभ झाला तेव्हा आम्हाला ऑनलाईन उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं. आम्हाला साधी एक लिंक तयार करुन देण्यात आली नाही. यूट्यूबवर कार्यक्रम पाहायला सांगण्यात आलं. कुलगुरुंविरोधातील रोष आजच्या निर्णयातून व्यक्त झाला. व्यवस्थापन परिषदेत आम्ही काही सांगायला गेलो तरी त्या आमचं ऐकायला तयार नसतात, असं देखील व्यवस्थापन परिषद सदस्या अश्विनी चव्हाण यांनी सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.