यंदा पितृ पक्ष शनिवार, 10 सप्टेंबरपासून सुरू झाले आहे. पितृपक्षात पितरांच्या आत्मतृप्तीसाठी श्रद्धेने जे काही कर्म केले जाते त्याला श्राद्ध म्हणतात. श्राद्ध म्हणजे श्रद्धा. या वर्षी पितरांचे श्राद्ध कर्म 10 सप्टेंबर ते 25 सप्टेंबरपर्यंत असेल. पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध केले जाते. मात्र श्राद्ध कुणी करावे किंवा महिलांनी श्राद्ध करावे का हा मोठा प्रश्न आहे. आज आपण याचे उत्तर जाणून घेणार आहोत.
श्राद्ध म्हणजे काय?
ऋषी पराशर यांनी सांगितले आहे की, तेथील स्थळ आणि परिस्थितीनुसार जव, काळे तीळ, कुश इत्यादींच्या जपाने जे काही कर्म श्रद्धेने केले जातात, त्याला श्राद्ध म्हणतात. जर पितर श्राद्धाने प्रसन्न झाले तर ते आपल्या वंशजांना सुख, समृद्धी, संततीसुख इत्यादींचा आशीर्वाद देतात.
महिला पिंडदान करतात का?
गरुड पुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीला मुलगा नसेल तर अशा स्थितीत कुटुंबातील महिला आपल्या पितरांचे श्राद्ध आणि पिंड दान करू शकतात. या स्थितीत मुलगी, पत्नी आणि सून पितरांचे श्राद्ध करू शकतात. गरुड पुराणानुसार, जर कन्येने आपल्या पितरांचे खर्या भक्तीभावाने श्राद्ध केले, तर पुत्र नसताना वडील तिचा स्वीकार करतात आणि आशीर्वाद देतात.
महिलांनी या गोष्टींची घ्यावी काळजी
DNA हिंदीच्या माहितीनुसार, महिलांनी श्राद्ध करताना पांढरे आणि पिवळे कपडे घालावेत. धार्मिक मान्यतेनुसार केवळ विवाहित महिलांनीच श्राद्ध करावे. कुश, पाणी आणि काळे तीळ टाकून तर्पण करू नये. श्राद्धाची तिथी आठवत नसेल तर नवमीला वयोवृद्ध स्त्री-पुरुषांचे आणि पंचमीला मुलांचे श्राद्ध करावे.