गणेशोत्सव म्हटलं की कोकणातली मंडळी गावाकडे निघतात. कोकण आणि तिथल्या लोकांचा जीव असलेली कोकण कन्या एक्स्प्रेस नुकता आवाज आला तरी अनेक जण मनातल्या मनात कोकणाची भटकंती सुरू करतात. महाड तालुक्यातील ताम्हाणे गावातील एक कुटुंबाने चक्क कोकणाचा देखावा साकारला आहे. हा देखावा अतिशय सुंदर आहे.
हा देखावा पाहिल्यानंतर तुम्हाला कोकणात जाण्याचा मोह आवरणार नाही. या देखाव्याची सध्या सगळीकडे चर्चा होत आहे. कोकण कन्या एक्स्प्रेसही कोकणातील लोकांचा श्वास आहे. कोकणात जाण्यासाठी कोकण कन्याचं तिकीट मिळवण्यासाठी तीन महिने आधीपासून लगबग सुरू होते.
कोकणाची शान दाखवणारा हा गणपतीचा देखावा कौतुकास्पद आहे. या देखाव्याचं सोशल मीडियावर खूप कौतुक होत आहे. संजय आंबेडे याच्या डोक्यात ही कल्पना आली. त्यांनी ही कल्पना साकार करायचं ठरवलं. कोरोनामुळे २ वर्ष गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता आला नव्हता.
यंदाचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. ही कल्पना यानिमित्ताने देखाव्यासाठी तयार करायची ठरली. मग काय कुटूंबतील मंडळी कामाला लागले. आंबेडे कुटुंबाने मिळून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे.