महाराष्ट्राला प्रशासकीय अधिकाऱ्यांची फार मोठी परंपरा लाभली आहे. महाराष्ट्रातील, मराठी मातीत जन्माला आलेल्या अनेक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर परराज्यातच नव्हे तर देशात आपल्या राज्याचे नाव मोठे केले आहे. त्यामुळे तरुण मराठी अधिकाऱ्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कार्याचा, त्यांच्या अनुभवामुळे मराठी तरुणाईला प्रेरणा मिळावी, मराठी मातीत जन्माला आलेल्या पण आता, केरळ राज्यात सेवा बजावत असलेल्या आयपीएस अधिकारी ऐश्वर्या डोंगरे यांच्याबाबत.
ऐश्वर्या डोंगरे या त्यांच्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण झाल्या. त्यांनी संपूर्ण देशात 196 रँक मिळवली आहे. यानंतर त्या भारतीय पोलीस सेवेत रूजू झाल्या. ऐश्वर्या डोंगरे यांचा दिवस सकाळी 7 वाजता सुरू होतो आणि उशिरा संपतो. भारतीय पोलीस सेवेच्या (IPS) केरळ केडरमध्ये सामील होऊन पाच वर्षे झाली आहेत.
ऐश्वर्या यांचा जन्म मुंबईत झाला आहे. तसेच त्या मुंबईतच वाढल्या. त्यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्रात दुहेरी पदवी घेतली आहे. यानंतर त्यांनी UPSC परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्षाची सुट्टी घेतली होती. यूपीएसची तयारी करत अनेकांची अनेक वर्ष निघून जात. त्यात काहींनाच यश मिळते. मात्र, ऐश्वर्या यांनी वयाच्या 22 व्या वर्षी सेवेत रुजू होत, आपले कर्तृत्व सिद्ध केले.
अल्पावधीतच ऐश्वर्या केरळमध्ये अनेक वेळा त्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे चर्चेत आल्या आहेत. सध्या 27 वर्षीय ऐश्वर्या या केरळ राज्यात त्रिशूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावत आहे. त्या कायदा व सुव्यवस्था राखणे आणि अंमली पदार्थांचा बंदोबस्त करण्याव्यतिरिक्त महिला आणि मुलांसाठी विविध सुरक्षा उपक्रमांमध्ये आणि सायबर-गुंडगिरी ऑपरेशन्समध्येसुद्धा आघाडीवर आहेत.
मला नेहमीच वाटत होते की, विकास आणि वाढ प्रक्रियेचा आणि प्रशासनाचा भाग व्हायचे. मला असे वाटते की, इतर कोणतेही काम अशा प्रकारचे एक्सपोजर देऊ शकत नाही. जर तुम्हाला बदल पाहायचा असेल तर तुम्हाला बदल व्हायला हवे. हे तुम्हाला तळागाळातील लोकांच्या जवळ ठेवते. तसेच या माध्यमातून तुम्ही दैनंदिन प्रशासकीय, विकास आणि सुरक्षा-संबंधित समस्या समजून घेण्यास आणि लोकांशी संबंधित उपाय शोधण्यात सक्षम राहतात. तुम्हाला लोकांशी संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला भाषा बोलता येणे आणि समजणे शिकणे आवश्यक आहे, असे मत त्या मांडतात.
कोरोना काळातील कामगिरी –
भारतात हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या महासंकटाविरोधात लढण्यासाठी देशभरातील नागरिक लढाई देत होते. त्यात डॉक्टर पोलीस, यांची भूमिका ही महत्वाची होती. तेव्हा 2020 मध्ये आयपीएस ऐश्वर्या डोंगरे या केरळमधील शांघुमुघममध्ये सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत होत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या शांधुमुघम येथे महत्वाची भूमिका बजावली.
शांघुमुघममध्ये परप्रांतीय कामगारांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. त्याठिकाणी ऐश्वर्या यांनी भेट दिली. 600 ते 800 कामगार शांघुमुघम अडकले होते. त्याच्यासोबत ऐश्वर्या यांनी एक तास चर्चा करुन त्यांना कोरोना बाबत जागृतीची माहिती दिली. त्यांच्या समस्या, समजून घेऊन त्यावर काय उपाय करता येईल याबाबत चर्चा केली. कामगारांना भेटण्यासाठी गेल्यावर त्यांनी आमचे आभार मानले. त्यांनी आमच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली तेव्हा आनंद झाला. हे माझ्यासाठी एक उपलब्धीच आहे, असे त्या म्हणाल्या होत्या.
शांघुमुघममध्ये पोस्टिंगच्या शेवटी, ऐश्वर्या प्रत्यारोपणासाठी तिरुवनंतपुरम ते कोचीपर्यंतच्या जिवंत हृदयाच्या प्रसिद्ध एअरलिफ्टमध्ये सहभागी होत्या. त्या आव्हानात्मक परिस्थितीची त्या अनेकदा आठवण करुन देतात. त्यावेळी मी विमानतळाची प्रभारी एसीपी होते. रूग्णालयापासून विमानतळापर्यंतच्या मार्गाला ग्रीन कॉरिडॉर बनवून रुग्णवाहिकेला मोकळेपणाने वावरता येईल याची खात्री करावी लागली. आम्हाला वैद्यकीय पथकाशी समन्वय साधावा लागला. आमच्याकडे केरळ पोलिसांचे हेलिकॉप्टर होते, ज्याने आम्हाला फक्त 35 मिनिटांत हृदय पोहोचवण्यात मदत केली.
अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर, हे कोणाचे हृदय आहे याची मला कल्पना नव्हती, कारण तुम्ही तुमचे कर्तव्य करत आहात, हे जोपर्यंत तुम्हाला माहिती आहे, तोपर्यंत तुम्ही हे कोणासाठी करत आहात किंवा तुम्ही हे का करत आहात हे महत्त्वाचे नाही, असेही त्या म्हणतात. “आज, मी पाहते की बर्याच महिलांना सेवेत येण्याची इच्छा आहे कारण तुम्हाला कोणत्याही समस्येचा समतोल दृष्टिकोन हवा आहे.
केरळ पोलिसांच्या जनमैत्री प्रकल्पाचा एक भाग म्हणून, मी अनेक आदिवासी वस्त्यांना भेट दिली आणि जेव्हा त्या महिला पोलिस अधिकारी पाहतात तेव्हा त्यांना तुमच्याशी बोलण्याची इच्छा होते. बर्याच मुली होत्या ज्यांना त्यांचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायचे होते, जे त्या इतर कोणाशीही करू शकत नव्हत्या. मला असे वाटते की, लोक स्त्रियांना सहानुभूती आणि करुणेने जोडतात.”, असेही त्या म्हणतात.