आज दि.२४ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

टीम इंडिया इतिहास घडवण्याजवळ, पाकिस्तानचा विक्रम मोडणार ‘गब्बर’ची सेना!

 वेस्ट इंडिज दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने पहिली वनडे जिंकत सीरिजची सुरूवात चांगली केली आहे. तीन वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताने पहिली मॅच 3 रनने जिंकली. आता दोन्ही टीममध्ये दुसरी मॅच रविवारी होत आहे. सीरिजच्या सगळ्या मॅच पोर्ट ऑफ स्पेनच्या क्वीन्स पार्क ओव्हल स्टेडियममध्ये होत आहेत. रविवारी होणाऱ्या सामन्यात टीम इंडियाला मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. एका टीमविरुद्ध लागोपाठ सर्वाधिक द्विपक्षीय वनडे सीरिज जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड टीम इंडिया करू शकते.

बेन स्टोक्सनंतर भारतीय खेळाडूही देणार निवृत्तीचा धक्का

इंग्लंडचा दिग्गज ऑलराऊंडर बेन स्टोक्सने मागच्या आठवड्यात वनडे क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्तीची घोषणा केली. स्टोक्सच्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला. क्रिकेटचे तिन्ही फॉरमॅट खेळणं शारिरिकदृष्ट्या शक्य नसल्याचं कारण देत स्टोक्सने वनडे क्रिकेटला अलविदा केलं. भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या मते भविष्यात टीम इंडियाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्याही वनडे क्रिकेटमधून संन्यास घेईल. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपनंतर हार्दिक पांड्या वनडे क्रिकेट सोडेल, असं भाकीत शास्त्री यांनी केलं आहे. स्टोक्सच्या निवृत्तीनंतर वनडे फॉरमॅटच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. येत्या काही काळात वनडे क्रिकेटचा अंत होईल, असं मत अनेक दिग्गज खेळाडूंनी व्यक्त केलं आहे.

नर्सच्या वेशात निघाली चोर; थेट प्रसुतीगृहात येऊन एक दिवसाच्या अर्भकाचं अपहरण

सांगलीच्या तासगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नर्स असल्याचे भासवून एका महिलेने एक दिवसाच्या अर्भकाचे अपहरण केले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बाबासाहेब पुरंदरे आणि शरद पवार एकाच फ्रेममध्ये, खरे पवार कोणते? ब्राह्मण महासंघाचा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिवंगत इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर काल टीका केली होती. त्यांनी केलेल्या टीकेवर आता ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी टीका केली आहे. विशेष म्हणजे आनंद दवे यांनी शरद पवारांचे बाबासाहेब पुरंदरेंसोबतते जुने फोटो आणि कौतुकाचे पत्र शेअर करत खरे पवार साहेब कोणते हे महाराष्ट्राला कळू द्या, असं विधान केलं आहे.

‘मनसेतही वादविवाद’; महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान अमित ठाकरेंचा गौप्यस्फोट

गेल्या अनेक दिवसांपासून मनसेचे अमित ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यानिमित्ताने अमित ठाकरे मनसेत सक्रिय होणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. आपल्या महाराष्ट्र दौऱ्याची क्षणचित्रे ते आपल्या सोशल मीडियावर जनतेसोबत शेअरही करीत आहे.दरम्यान त्यांनी एकदा माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं होतं. जर गृहमंत्रिपद दिलं तर पाठिंबा देणार असल्याचं म्हटलं होतं. यावरुन आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी गृहमंत्री होणार किंवा मला किंवा राज साहेबांना मंत्रिपद मिळणार या बातम्या खोट्या आहेत. लोकांना जोकही समजायला हवे. सरकारला पाठिंबा द्यायचा की नाही हा निर्णय राज साहेबच घेतील, मी फक्त मनविसेची पुनर्बांधणी करतो असं ते माध्यमांशी अनौपचारिक चर्चा करताना म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर, आई सरस्वती पाटील यांचं निधन

आपल्या आयुष्यात आईचं महत्त्व शब्दांमध्ये कधीच व्यक्त करता येणार नाही. आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे आपलं सारं काही, आपलं सर्वस्व. आईचं महत्त्व शब्दांमध्ये व्यक्त करणं अशक्यच आहे. स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी, असं म्हटलं जातं. ते अगदी खरंच आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यात आईची साथ आणि आशीर्वाद असणं जास्त आवश्यक आहे. पण आज महाराष्ट्रातील भाजपचे बडे नेते, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कारण चंद्रकांत पाटील यांच्या आईचं आज निधन झालं आहे.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दु:खाटा डोंगर कोसळला आहे. पाटील यांच्या मातोश्री सरस्वती बच्चू पाटील यांचे आज कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धावपकाळाने निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. सरस्वती पाटील यांनी वयाच्या 91 वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधना पश्चात 1 मुलगा, सून, 2 मुली (सातारा, आजरा) असा परिवार आहे.

समुद्रकिनारी सापडली व्हेल माशाची 28 कोटींची उलटी; मच्छिमारांनी केलं चकित करणारं काम

अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या पाहिल्यानंतर आपण त्यांच्या किमतीचा अंदाज आपल्याला लावता येत नाही. व्हेलची उलटी देखील तशीच आहे. व्हेलची उलटी म्हणजे आपल्याला किळस वाटेल, पण याची किंमत ऐकली तर चकीत व्हाल. एक कोटी रुपयांना एक किलो अशी याची किंमत आहे. एम्बरग्रीस नावाच्या व्हेलच्या उलटीची किंमत 1 कोटी रुपये प्रति किलो आहे. तिरुवनंतपुरमजवळील विझिंजम येथील मच्छिमारांच्या गटाला व्हेलच्या उलटी सापडली. त्याची किंमत 28 कोटींच्या जवळपास आहे. मात्र मच्छीमारांनी ती सरकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली.

सेन्सिबल माणसाबद्दल तरी विचारा, फडणवीसांचा राऊतांना खोचक टोला

 ‘संजय राऊत यांना आता तरी समज आली पाहिजे. त्यांनी पक्षाची काय अवस्था करून टाकली आहे. मला त्यांच्याबद्दल कशाला विचारता? सेन्सिबल माणसाबद्दल विचारा, असं म्हणत भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

गुप्तधनासाठी तीन वर्षीय मुलीचे अपहरण; अमावस्येच्या दिवशी देणार होते नरबळी

तीन वर्षीय मुलीचा नरबळी दिल्यास गुप्तधन मिळेल या आशेने चिखलीतील मुलीचं अपहरण करणाऱ्या एका कुटुंबाला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अपहरणाचा नाट्यातून तीन वर्षीय मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी विमल संतोष चौगुले, संतोष मनोहर चौगुले, सुनीता अशोक नलावडे, निकिता अशोक नलावडे यांना अटक करण्यात आली असून दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आलं आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांनी अमावस्या असून त्या दिवशी तुम्ही तीन वर्षीय मुलीचा नरबळी दिल्यास तुम्हाला गुप्त धन मिळेल अशी बतावणी एका भोंदू बाबाने केल्याने जुन्नर येथील चौगुले कुटुंब लहान मुलीच्या शोधात होतं. 

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.