फ्लॉप क्रिकेटरने केला मोठा ‘गेम’, राजकीय मैदानात काढली भाजपची विकेट!
बिहारमध्ये नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा भाजपची साथ सोडली आहे. काल मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार यांनी आज आरजेडीच्या मदतीने पुन्हा एकदा सत्तास्थापन करत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार यांच्यासोबत लालू प्रसाद यादव यांचे पूत्र तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री झाले आहेत. क्रिकेटच्या मैदानात फ्लॉप ठरलेल्या तेजस्वी यादव यांनी राजकारणाच्या मैदानात मात्र मोठा खेळ करत भाजपची विकेट काढली आहे. अखेर आज ठरल्याप्रमाणे नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 21 महिन्यांपूर्वीच नितीशकुमार यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं होतं. त्यावेळी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. मागील 17 वर्षांमध्ये तब्बल आठव्यांदा नितीशकुमार यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, हा बिहारमध्ये एका प्रकारे वेगळाच रेकॉर्ड आहे..
मेट्रो-3च्या वाढीव खर्चाला मान्यता, मंत्रिमंडळ बैठकीनंतर फडणवीसांनी दिली नवी ‘डेडलाईन’!
राज्यामध्ये मंत्रिमंडळाचा मंगळवारी विस्तार झाला, यानंतर आज सरकारचे नवे मंत्री पहिल्यांदाच मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित होते. मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये आज मोठे निर्णय घेण्यात आले, यामध्ये मुंबईतल्या मेट्रो-3 संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. मुंबई मेट्रो 3 च्या वाढलेल्या किंमतीला मान्यता देण्यात आल्याचा प्रस्ताव आला होता, या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचं फडणवीस म्हणाले.मुंबई मेट्रो-3 ची आधीची किंमत 23 हजार कोटी होती, पण मधल्या अडीच वर्षांमध्ये काम बंद असल्यासारखी परिस्थिती होती. आता त्याला 10 हजार कोटी रुपयांची वाढ देण्यात आली आहे. कार डेपोचं काम 29 टक्के पूर्ण झालं आहे. हे काम पूर्ण करून पहिली फेज 2023 पर्यंत सुरू झाली पाहिजे, असं नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहेत, असं फडणवीस म्हणाले.
मुंबई इंडियन्सची ‘फॅमिली’ वाढली, दोन नवे संघ लवकरच मैदानात
आयपीएलच्या मैदानात सर्वात यशस्वी ठरलेला संघ म्हणजे मुंबई इंडियन्स. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचं विजेतेपद पटकावलं आहे. मुंबईच्या या संघात रोहितसह, जसप्रीत बुमरा, सूर्यकुमार यादव, ईशान किशन अशा भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या शिलेदारांसह कायरन पोलार्डसारखा आंतरराष्ट्रीय टी20तला मोठा फलंदाजही आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचं फॅन फॉलोईंग प्रचंड मोठं आहे. संघाचा प्रत्येक चाहता हा ‘एमआय फॅमिली’चा एक भाग बनून जातो. आणि मुंबई इंडियन्सची हीच ‘फॅमिली’ आता आणखी विस्तारणार आहे. कारण मुंबई इंडियन्सनं दोन नवे संघ विकत घेतले आहेत.गेली 15 वर्ष मुंबई इंडियन्स सातत्यानं चांगली कामगिरी बजावतोय. आणि रिलायन्स इंडस्ट्रीजनं संयुक्त अरब अमिरात आणि दक्षिण आफ्रिकेतल्या ट्वेन्टी ट्वेन्टी लीगमध्येही आपला संघ उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि या दोन्ही लीगसाठी दोन नव्या संघांच्या नावाची घोषणा आज करण्यात आली.
‘मी निष्कलंक, आतापर्यंत मी शांत होतो, पण यापुढे…’, संजय राठोड आक्रमक
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे नेते, महाराष्ट्र सरकारमधील नवनिर्वाचित मंत्री संजय राठोड यांनी अखेर त्यांच्यावरील गंभीर आरोपांवर आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांमुळे राठोडांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. पण गेल्या दीड वर्षात पोलिसांच्या झालेल्या तपासात त्यांना क्लीन चीट मिळाल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केला होता. संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना विरोध केला होता. तसेच विविध स्तरावरुन त्यांच्यावर टीका करण्यात येत होती. अखेर या टीकेवर संजय राठोड यांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. यावेळी राठोड यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आपल्यावर अशाप्रकारे आरोप यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. एवढ्या दिवसांपासून आम्ही गप्प होतो. पण यापुढे कायदेशीर पाऊल उचललं जाईल, असे संकेत राठोडांनी दिले.
राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये हृदय विकाराचा झटका
आपल्या कॉमेडीने चाहत्यांच्या मनावर राज्य करणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांना जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आला. रिपोर्ट्सनुसार, ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना अचानक छातीत दुखू लागले आणि ते खाली पडले. त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. राजू श्रीवास्तव 58 वर्षांचे असून ते त्यांच्या चांगल्या फिटनेससाठी ओळखले जातात. अनेक प्रकरणांमध्ये, असे दिसून आले आहे की जिममध्ये व्यायाम करताना, लोकांना हार्ट अटॅक किंवा हृदयविकाराचा झटका येतो.
उडत्या विमानाच्या छतावर उभी राहिली 93 वर्षांची आजी, हजारो फूट उंचावर खतरनाक स्टंट
आकाशात उंच उडावं असं कुणाला वाटत नाही. यासाठी विमान, पॅराशूट, हॉट एअर बलून असे बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण तरी काही जणांना साध्या विमानातही बसण्याचीही भीती वाटतं. असं असताना एका आजीबाई मात्र उडत्या विमानाच्या छतावरच उभ्या राहिल्या आणि आकाशात उंच उडण्याचा त्यांनी आनंद घेतला. खतरो की खिलाडी बनलेल्या या आजीबाईंना पाहून तरुणही हादरले आहेत. यूकेतील 93 वर्षांच्या बेट्टी ब्रोमेज ज्यांनी उडत्या विमानाच्या छतावर चढून सर्वांना धक्का दिला आहे. या वयात अनेकांना स्वतःचा तोलही सांभाळता येत नाही. काठीशिवाय चालताही येत नाही अशा वयात या आजींनी खतरनाक स्टंट केला. त्या खतरों की खिलाडी बनल्या. बीबीसीच्या BBC Gloucestershire या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.
मराठा विद्यार्थ्यांसाठी अशोक चव्हाण उतरले मैदानात; EWS प्रमाणपत्रावरून थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण आणि नोकरीत मराठा आरक्षण देण्याचा निर्णय अजूनही रखडला आहे. त्यामुळे EWS म्हणजे इकोनॉमिकली विकर सेक्शन या पर्यायांमधून अनेक मराठा शिक्षणचा आणि स्पर्धा परीक्षेत लाभ मिळतो आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थ्यांना या EWS प्रमाणपत्रासाठी तहसीलदार कार्यालयात जाऊन आपले तळवे झिजवावे लागत आहेत. तहसीलदार अशा विद्यार्थ्यांना EWS प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करत आहेत. असा आरोप कम माहिती देऊ करणारं एक पत्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लिहिलं आहे.
रिझर्व्ह बँकेचा सर्वात मोठा झटका, महाराष्ट्रातील रुपी बँकेचा परवाना बंद, गाशा गुंडाळण्याचे आदेश
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने महाराष्ट्रातील आणखी एका सहकारी बँकेवर कारवाई केली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रुपी को-ऑपरेटिव्ह बँकेचा थेट परवानाच रद्द केला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर रिझर्व्ह बँकेने याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे. रुपी बँकेचा आता थेट परवानाच रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेचा हा आदेश आजपासून सहा आठवड्यांनंतर म्हणजेच 22 सप्टेंबर 2022 पासून लागू होईल, अशी माहिती समोर आली आहे.
चंद्रकांत पाटलांचं खातं कट, विखे पाटलांवर मोठी जबाबदारी?
महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडतंय त्याची आपण कल्पना कधी केली नसेल. महाराष्ट्रात स्थापन झालेल्या नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गेल्या 40 दिवसांपासून रखडलेला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. पण विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु होण्याआधी अखेर नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या आणि भाजपच्या प्रत्येकी नऊ नेत्यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर या नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप आज संध्याकाळी जाहीर होण्याची शक्यता आहे. या खातेवाटपात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांना कदाचित हव्या असणाऱ्या खात्याचं मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे, अशी चर्चा सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांना महसूल मंत्रीपद हवं आहे. त्यासाठी ते आग्रही होते. पण ते खातं त्यांच्याऐवजी भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
चाईल्ड पोर्नोग्राफी, सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांनाच प्रशिक्षण; पोलिसांकडून विशेष क्लास
विविध गुन्ह्यांमध्ये विधीसंघर्षग्रस्त बालकांचे प्रमाण वाढून बीड जिल्हा वाईट गोष्टीसाठी चर्चेत आला होता. जिल्ह्यात लाॅकडाऊन काळात चाइल्ड पोर्नोग्राफीच्या प्रकरणात अल्पवयीन आरोपींची नावे समोर आली होती. यामुळे जिल्ह्यात पोलीस विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना कायद्याचे धडे दिले जात आहेत. 75 शाळा आणि महाविद्यालयात हा उपक्रम राबवला जाणार आहे.
वितळत्या हिमनदीमुळे उघड झालं 54 वर्षांपूर्वीचं रहस्य, मानवी हाडांसोबत मिळाला विमानाचा सांगाडा
युरोपमध्ये या वेळेस असह्य उकाडा होता. दरवर्षी उन्हाच्या तीव्रतेत वाढ होत आहे. त्यामुळे आता तिथल्या हिमनद्या वितळू लागल्या आहेत. स्वित्झर्लंडमध्ये वितळत असलेल्या या हिमनद्यांमुळे अनेक वर्ष गाडली गेलेली रहस्य उघड होऊ लागली आहेत. याबाबत टिव्ही 9 भारतवर्ष च्या वेबसाईटवर वृत्त देण्यात आलं आहे.या वाढत्या उष्णतेमुळे ज्या हिमनद्या वितळत आहेत, त्यांच्याकडे पोलिसांसह सर्वसामान्यांचंही लक्ष लागलं आहे. आल्प्समध्ये नोंद झालेल्या विक्रमी उच्च तापमानामुळे हिमनदी वितळली. वितळलेल्या हिमनदीमुळे तयार झालेल्या पाण्यात एका दुर्घटनाग्रस्त विमानाचा शोध लागला आहे. 1968 च्या जून महिन्यात जंगफ्राऊ आणि मोन्च पर्वतशिखरांच्या जवळ एल्तेश ग्लेशियरच्या परिसरात हे विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात एका गिर्यारोहण मार्गदर्शकाने या विमानाचा शोध लावला होता. थोडक्यात, या वितळत्या ग्लेशियर्स म्हणजे हिमनद्यांमुळे 54 वर्षांपूर्वीचं रहस्य समोर आलं आहे. इथं मानवी हाडांसोबत विमानाचा सांगाडाही सापडला आहे.
SD Social Media
9850 60 3590